आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३२ काॅलेजांमध्ये कौशल्य विकासाचा अभ्यासक्रम; व्यवस्थापन परिषदेने दिली मान्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- युवकांना रोजगारक्षम करण्याच्या दृष्टिने पश्चिम विदर्भातील ३२ महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू केल्या जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाची विशेष योजना तसेच राष्ट्रीय कौशल्य योग्यता आराखड्याच्या अनुषंगाने विविध कौशल्य अभ्यासक्रम आरंभ केले जाणार आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत आज (५ सप्टेंबर) मान्यता दिली. 


सर्वच क्षेत्रात मागास असलेल्या पश्चिम विदर्भाच्या पाचही जिल्ह्यात रोजगाराची विविध साधने उपलब्ध व्हावीत म्हणून प्रयत्न केल्या जात आहे. काही प्रमाणात उद्योग तसेच स्वयंरोजगार उभा केल्या जात आहे. रोजगार किंवा स्वयंरोजगार करण्याचे कौशल्य येथील युवकांमध्ये निर्माण व्हावे म्हणून त्याप्रकारचे अभ्यासक्रम सुरू होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. युवकांमध्ये कौशल्य विकसीत झाल्यास रोजगार प्राप्त करणे शक्य होत असल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विशेष प्रकल्प अंतर्गत कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. विभागातील पाच ही जिल्ह्यातून अनेक महाविद्यालयांनी या प्रकल्पाचे स्वागत करीत प्रस्ताव सादर केले होते. मात्र, उपलब्ध संसाधनांच्या आधारे विभागातील ३२ महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारचे कौशल्य अभ्यासक्रम सुरू करण्याच्या प्रस्तावास विद्यापीठाच्या विकास विभागाने सकारात्मकता दर्शविली. राष्ट्रीय कौशल्य योग्यता आराखड्यानुसार या महाविद्यालयांचे प्रस्ताव तयार करण्यात आले असून मान्यतेकरिता व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीसमोर ठेवण्यात आले होते. 


कौशल्य अभ्यासक्रमांचा समावेश 
१)इनफार्मेशन टेक्नॉलॉजी 
२) ऑटोमोबाइल 
३) अॅग्रीकल्चर 
४) इलेक्ट्रीकल्स 
५) फोटोग्राफी अॅण्ड व्हिडीओग्राफी 
६) हेल्थ केअर असिटंन्ट 
७) होकल अॅण्ड इंन्स्ट्रुमेंटल म्युझिक 
८) हेल्थ केअर 
९) फॅशन डिझायनिंग 
१०) साॅफ्टवेअर डेव्हलपमेंट 
११) इंडस्ट्रीयल केमेस्ट्री 
१२) व्हेइकल टेस्टींग 
१३) ब्युटी अॅण्ड वेलनेस 
१४) फुड प्राेसेसिंग टेक्नॉलॉजी 
१५) बॅकींग अॅण्ड फायनान्स 
१६) ऑर्गनिक फार्मिंग 
१७) हार्टीकल्चर 
१८) मेडीकल इक्वीपमेंट 
१९) टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट 
२०) इंडस्ट्रीयल इलेक्ट्रानिक्स अॅण्ड कॅम्प्युटर हार्डवेअर 
२१) कॉस्मेटीक टेक्नॉलॉजी 
२२) हर्बल टेक्नॉलॉजी 
२३) फुड प्राेसेसिंग अॅण्ड क्लॉलिटी मॅनेजमेंट 
२४) फुड प्रोसेसिंग अॅण्ड प्रिझरव्हेशन 
२५) ड्रेस डिझायनिंग अॅण्ड अपरेल प्रॉडक्शन 
२६) मिडीया अॅण्ड इंटरटेनमेंट मास कॅम्युनिकेशन 
२७) सेक्युरिटी आयटी 
२८) बँकींग फायनान्स सर्व्हीसेस 
२९) अॅकाऊंट अॅण्ड टॅक्सेस 
३०) बांधकाम 
३१) टूरिझम अॅण्ड हॉस्पीटॅलिटी 
३२) रिटेल मॅनेजमेंंंट 
३३) असोसियट नेटवर्क इंजीनिअर 
३४) सिव्हील कंस्ट्रक्शन सुपरव्हीजन 
३५) नर्सरी डेव्हलपमेंट अॅण्ड टिशू कल्चर 
३६) टेक्सटाईल अॅण्ड जीनिंग टेक्नॉलॉजी 
३७) कम्युनिकेशन स्कील इन इंग्लीश 
३८) कम्प्युटर फॉर प्रिपरेशन इन सिव्हील सर्व्हीस 

 

जिल्हानिहाय महाविद्यालय  
अकोला ९ 
वाशिम ५ 
अमरावती ८ 
बुलढाणा ६ 
यवतमाळ ४ 
एकूण ३२ 


कार्योत्तर मान्यता 
कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्यास व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. महाविद्यालयांकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रीय कौशल्य योग्यता आराखड्यानुसार अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 
- डॉ. अजय देशमुख, कुलसचिव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ 

बातम्या आणखी आहेत...