आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईला घराबाहेर करणाऱ्या तीन मुलांना शिक्षा, महिन्यातून एक दिवस वृद्धाश्रमात ज्येष्ठांची सेवा कराया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - 66 वर्षांच्या ज्येष्ठ श्यामा देवांगन यांना घराबाहेर करणारी मुले आता परत त्यांच्या आईची सेवा करू लागले आहेत. पण तरीही दंडाधिकारी मुकुल गुप्ता यांनी तिघांनी दोषी ठरवत महिन्यातून एक दिवस वृद्धाश्रमात जाभन सेवा करण्याचा आदेश दिला आहे. तसेच या दरम्यान त्यांना वृद्धाश्रमात ज्येष्ठांबरोबर फोटो काढावे लागतील. याचा रेकॉर्ड जमा करून तो कोर्टात हजर करावा लागेल. त्यांना 6 महिने ही शिक्षा भोगावी लागेल. तिन्ही मुलांना दर महिन्याच्या 5 तारखेला 5-5 हजार रुपये आईच्या खात्यात जमा करावे लागतील. 


जाणीव होण्यासाठी 
मुलांना दर महिन्याला दोन दिवस कुटुंबासह आईबरोबर घालवावे लागतील. त्यांची काळजीही घ्यावी लागेल. आईचा वाढदिवस येईल तेव्हा मुलांना कुटुंबासह त्यांच्याकडे जाऊन वाढदिवस साजरा करावा लागेल. आईने प्रॉपर्टीची कागदपत्रे मिळाल्याने मुलांना माफ करण्याची विनंती केली होती. मुलांनी जसे एक वर्ष आईला त्रास दिला त्यानंतर त्यांना शिक्षा होणे गरजेचे होते. त्यामुळे हा आदेश देणयात आला. आईची सेवा करतानाच त्यांना वृद्धाश्रमात यागोष्टीची जाणीव व्हावी की, एकट्या ज्येष्ठाचे दुःख काय असले हा त्यामागचा उद्देश होता. 


आई म्हणाली-मुले, सून सगळे आले 
श्यामा देवांगन यांनी एसडीएमना फोनवर सांगितले की, त्यांची तिन्ही मुले एका वर्षाने त्यांच्याकडे आली आहेत. सुनांनाही सोबत घेऊन आली आहेत. त्यांना चूक कळली आहे, त्यांना तुरुंगात पाठवू नका. 


..तर तुरुंगात जावे लागणार 
दंडाधिकारी म्हणाले की, कायद्यानुसार त्यांना आदेश देण्यात आला आहे. त्याचे पालन केले नाही, तर मुलांना 3 महिने तुरुंगात राहावे लागेल. 5 हजार दंडही भरावा लागेल. 


काय आहे प्रकरण 
गेल्या आठवड्यात श्यामा देवांगन यांनी खटला दाखल केला होता. त्यांनी सांगितले होते की, त्यांना तीन मुले आहेत. तिघे मोठ्या कंपन्यांमध्ये कामाला आहे. मुलांनी घराची कागदपत्रे, एफडी आणि सोने चांदी त्यांच्याकडे ठेवून आईला रायपूरला पाठवले होते. सुनावणीनंतर मुलांनी 6 लाखांची एफडी, 10 तोळे सोने आणि त्यांचे घर आईला सोपवले. 

बातम्या आणखी आहेत...