आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Court Approves Parsamal Jain's Apology Application For Murder Case Of Pawanraje Nimbalkar

पवनराजे निंबाळकर हत्त्या प्रकरणी आरोपी पारसमल जैनच्या माफीच्या साक्षीदारीला कोर्टाची मंजुरी

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद : राज्यभर गाजलेल्या काँग्रेस नेते पवनराजे व त्यांचा चालक समद काझी या दुहेरी हत्याप्रकरणी आरोपी पारसमल जैन याने माफीचा साक्षीदार होण्याबाबत सीबीआय कोर्टासमोर अर्ज केला हाेता. सत्य सांगण्याच्या अटीवर या अर्जाला न्यायालयाने मंजुरी दिली आहे.

तीन जून २००६ रोजी मुंबईच्या कळंबोली येथे काँग्रेस नेते पवन राजे निंबाळकर व त्यांचा कारचालक समद काझी या दोघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याचा आरोप होऊन याप्रकरणी माजी मंत्री पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, पारसमल जैन, दिनेश तिवारी, पिंटू सिंग, कैलास यादव, छोटू पांडे, शशिकांत कुलकर्णी आदींवर गुन्हा दाखल झाला. दरम्यान, तपासावर शंका उपस्थित करत प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी कै. पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांनी केली होती. त्यानुसार तपास सीबीआयने करून सध्या सीबीआयच्याच न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, या हत्या प्रकरणातील ४ क्रमांकाचा आरोपी पारसमल जैन याने दि.४ डिसेंबर २०१९ रोजी न्यायालयाकडे माफीचा साक्षीदार करण्याबाबत विनंती अर्ज केला होता. यावर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन न्यायालयाने जैन याचा माफीचा साक्षीदार करण्याचा अर्ज २१ डिसेंबर रोजी मंजूर केला आहे.
 

बातम्या आणखी आहेत...