आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मर्यादेत डीजे वाजवला तरी पाेलिस कारवाई का? काेर्टाने मागवले सरकारचे म्हणणे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादेत राहून डीजे आणि डॉल्बी सिस्टिमचा वापर करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई का, असा सवाल करत डीजे व्यावसायिकांची संघटना असलेल्या प्रोफेशनल ऑडिओ आणि लायटिंग असोसिएशन (पाला) या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर न्यायालयाने सरकारला शुक्रवारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


'पाला' संस्थेने अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली. न्या. शंतनू केमकर आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी सुरू आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून डीजे चालकांवर कारवाई सुरू केली. राज्यभरात अनेक ठिकाणी पोलिसांनी नोटिसा पाठवून साउंड सिस्टिमची गोदामे गणेशोत्सवापर्यंत सील केल्याचेही याचिकेत नमूद केले अाहे. 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...