आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्वाल्हेर - सीतेचा (बदललेले नाव)संसार पती व दोन मुलांसह सुखाने चालू होता. ती सहायक प्राध्यापिका आहे. नाेकरीनिमित्ताने ती इटाव्यास राहण्यासाठी गेली. काही काळानंतर तिला गर्भ राहिला. तेव्हा पती श्यामकुमार (बदललेले नाव) यावर संतापला. हे मूल माझे नाहीच, असा विश्वामित्री पवित्रा त्याने घेतला. मी गेले वर्षभर तिच्याजवळ राहत नाही. मग हे मूल माझे कसे असेल? असा संशय तो घेत होता. त्याने घटस्फोटासाठी अर्ज दिला. पत्नीने आरोप फेटाळले. शेवटी न्यायालयाने डीएनए चाचणीचे आदेश दिले. दोघेही तयार झाले. पती-पत्नी व मुलीचे नमुने घेण्यात आले. चाचणीचा अहवाल आला. तोच या तिसऱ्या मुलीचा पिता ठरला. अतिरिक्त मुख्य न्यायाधीश हितेंद्रसिंह शिसोदिया यांनी घटस्फोटाची मागणी फेटाळली.
बाबाच्या नादात पतीने आयुष्याची ८ वर्षे वाया घातली
सीता सांगते, मे २००३ मध्ये लग्न करून ग्वाल्हेरला आले. माझे शिक्षण एमएस्सी मॅथ्स असे झालेले आहे. डीएड केले. नंतर पतीने कोचिंग क्लासमध्ये शिकवण्यास प्रोत्साहन दिले. २००५ मध्ये पहिली मुलगी झाली. २००८ मध्ये मुलगा झाला. २००९ मध्ये उत्तर प्रदेशात सहायक प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. नोकरीदरम्यान जाण्या-येण्याचा त्रास वाचवण्यासाठी पतीशी बोलून तेथे राहण्यास गेले. ते सोबत राहत होते. २०११ मध्ये पुन्हा दिवस गेले. त्यांनी खोटे आरोप करत मला घटस्फोट मागितला. सासरी विचारले तर तो एका बाबाच्या नादाला लागला आहे, असे समजले. बाबाने त्याला पत्नीचे चरित्र चांगले नसल्याचे पढवले होते. २०१४ मध्ये प्रकरण न्यायालयात गेले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.