आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली कमाई घेऊन आलेल्या तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न, कोर्टाने शिक्षा सुनावताच थरथर कापायला लागला फलाहारी बाबा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलवर - राजस्थानच्या अलवर येथील जिल्हा सेशन जजने बलात्काराच्या एका बहुचर्चित प्रकरणात रामानुजाचार्य कौशलेंद्र प्रपान्नाचार्य उर्फ फलाहारी महाराजला जन्मठेप एक लाखांचा दंड सुनावला आहे. शिक्षा ऐकताच 60 वर्षीय बाबा आधी थरथर कापू लागला आणि नंतर डोके पकडून खाली बसला. अलवर पोलिसांनी 23 सिप्टेंबर 2017 ला फलाहारी बाबाला छत्तीसगडच्या विसालपूर येथील 21 वर्षीय तरुणीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात अटक केली होती. पीडितेने विलासपूर महिला ठाण्यात 11 सप्टेंबर 2017 ला बाबाच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. 


पहिली कमाई घेऊन गेली होती बाबाकडे 
तरुणीने रिपोर्टमध्ये लिहिले होते की, कुटुंबाचे बाबाबरोबर 25 वर्षांपासून कौटुंबीक संबंध होते. तरुणीने लॉनंतर इंटर्नशिप पूर्ण केली. त्यानंतर 3 हजार रुपयांची पहिली कमाई घेऊन ती बाबांना अर्पण करण्यासाठी गेली. 7 ऑगस्ट 2017 रोजी ही तरुणी  कालाकुआं येथील बाबाच्या आश्रमात पोहोचली. तेव्हा बाबाने अश्लिल कृत्य करत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. 


अन्न खात नाही, वृद्ध असल्याचे कारण देत नरमाईची विनंती 
फलाहारी बाबाचे वकील अशोक शर्मा आणि संजीव कारगवाल म्हणाले की, बाबा 60 वर्षांचे वृद्ध आहेत. आजारी असतात. अन्न खात नाही. वर्षभरापासून न्यायालयीन कोठडीत आहेत. वजन 40 किलोने घटले आहे. बाबाच्या आश्रमात शेकडो मुलींना वेदाचे धडे दिले जातात. जर शिक्षा देताना नरमाईची भूमिका अवलंबली नाही तर तरुणींचे भवितव्य खराब होईल. 


पीडितेचे वकील म्हणाले, कठोर शिक्षा द्या.. अन्यथा लोकांमधली आस्था संपून जाईल 
पीडितेचे वकील म्हणाले की, पीडितेचे संपूर्ण कुटुंब बाबाला गुरू, संरक्षक, पितृतुल्य आणि देव मानत होते. अशा गुन्ह्यांमध्ये नरमाईची भूमिका घेतली तर लोकांच्या मनातून आस्था संपून जाईल आणि गुन्हेगारांना बळ मिळेल. त्यामुले कठोर शिक्षा द्यावी. 

 

 

बातम्या आणखी आहेत...