आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्टाने अवमान याचिकेवर तिवारींकडून मागितले उत्तर;बांधकामाचे सील ताेडल्याचे प्रकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अवैध बांधकामाचे सील तोडल्याप्रकरणी मंगळवारी सर्वाेच्च न्यायालयाने दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांना चांगलेच फटकारले. तसेच खासदार अाहात म्हणून तुम्हाला कायदा हातात घेण्याचे स्वातंत्र्य मिळू शकत नाही. खासदार तिवारींची अशी वर्तणूक दुर्दैवी असल्याचे सांगत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. या वेळी तिवारी हेदेखील न्यायालयात उपस्थित हाेते. 


या वेळी न्यायमूर्ती मदन बी.लोकूर व दीपक गुप्ता यांच्या पीठाने सांगितले की, सील केली जावीत अशी हजार बांधकामे असल्याचे तुम्ही (तिवारी) म्हणतात. त्यांची यादी अाम्हाला द्या; अाम्ही तुम्हाला सीलिंग अधिकारी बनवताे. याबाबतची सर्व माहिती एक अाठवड्याच्या अात शपथपत्रातून द्यावी, असे निर्देश तिवारींना दिले. दरम्यान, गत १६ सप्टेंबरला उत्तर-पूर्व दिल्लीतील गोकूलपूर गावात तिवारींनी एका घराचे सील तोडले हाेते. याप्रकरणी पाेलिसांनी तिवारींविरुद्ध गुन्हा दाखल केला अाहे. तिवारींचे वकील विकास सिंह यांनी दिल्लीत हजाराे जागी मनमानीपणे व अयाेग्य पद्धतीने सीलिंगची कारवाई सुरू असल्याचे सांगितले हाेते. तसेच ही समिती हजाराे अनधिकृत बांधकामे सील करत नसल्याचे वक्तव्य तिवारींनी केले हाेते. त्यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे सर्वाेच्च न्यायालयाने गठीत केलेल्या निगराणी समितीने न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करून तिवारींवर कठाेर कारवाई करण्याची मागणीही केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ अाॅक्टाेबरला हाेणार असून, त्या वेळी उपस्थित राहण्याचे अादेशही न्यायालयाने तिवारींना दिले अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...