आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला नांदायला का पाठवत नाही असे म्हणत मेहुण्याला भोसकला होता चाकू..आरोपीस जन्मठेप, पत्नी, शेजाऱ्याची साक्ष ठरली निर्णायक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पत्नीला नांदायला का पाठवत नाही असे म्हणत मेहुण्याचा (पत्नीचा भाऊ) चाकूने भोसकून खून करणाऱ्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी जन्मठेप व १५  हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. नुकसान भरपाईपोटी जखमी लक्ष्मीबाईला दंडातील १५ हजार रुपये द्यावे असे आदेशात म्हटले. घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार मृताची पत्नी लक्ष्मीबाई व शेजारी देविदास जाधव यांची साक्ष निर्णायक ठरली.

 

सिल्लोड येथील पंचायत समितीच्या वसाहतीमध्ये राजेंद्र सखाराम वानखेडे (४२) हा आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. त्यांच्या बहिणीचे लग्न भोकरदन तालुक्यातील सुरंगळी येथील रत्नाकर दत्तु जाधव (४८)सोबत झाले होते. या पती - पत्नीमध्ये खटके उडत असल्यामुळे ती भावाकडे येऊन राहत होती. याचा जाब विचारण्यासाठी रत्नाकर जाधव ४ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास सिल्लोडला आला. घरामध्ये  राजेंद्र वानखेडेची पत्नी लक्ष्मीबाई असल्यामुळे रत्नाकरने तिच्याशी वाद घालण्यास प्रारंभ केला.  यावेळी रत्नाकरने पत्नीच्या भावजयीस बेदम मारहाण केली. त्यात ती जबर जखमी झाली.त्याचवेळी राजेंद्र घरी आल्यानंतर रत्नाकर आणि राजेंद्रमध्येही वाद झाला. रत्नाकरने रागाच्या भरात राजेंद्रवर चाकूने वार केले. त्यावेळी मध्यस्थी करणारा शेजारी देविदास जाधव हा देखील जखमी झाला. 


चार दिवसानंतर ८ ऑगस्ट रोजी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात त्याचे निधन झाले. या खून खटल्याची अंतिम सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्या समोर झाली मुख्य सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी १४ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यामध्ये लक्ष्मीबाई, देविदास जाधव या दोघांची साक्ष महत्त्वाची ठरली. 

 

बातम्या आणखी आहेत...