आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्रमातील 6 जणांच्या मृत्यूच्या 2 प्रकरणांमध्ये रामपाल दोषी, हिसार शहराला छावणीचे स्वरुप, कलम 144 लागू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिसार - हरियाणामध्ये बरवाला येथील सतलोक आश्रमाचे संचालक रामपालला चार वर्षांपूर्वी त्याच्या आश्रमात झालेल्या सहा मृत्यूप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. त्याच्या शिक्षेसंदर्भात सुनावणी राखून ठेवण्यात आली आहे. त्याच्या समर्थकांकडून हिंसाचार केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने सुरक्षेची जय्यत तयारी केली असून हिसार जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू केले आहे. 


नोव्हेंबर 2014 मध्ये सतलोक आश्रमात पोलिस आणि रामपाल समर्थक आमने सामने आले होते. त्यादरम्यान पाच महिलांसह एका चिमुरड्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आश्रमाचा संचालक रामपालवर हत्येची दोन प्रकरणे दाखल करण्यात आली होती. केस क्रमांक - 429 (4 महिला आणि एका चिमुरड्याचा मृत्यू) मध्ये रामपालसह 15 आरोपी आहेत. तर केस नंबर-430 (एका महिलेचा मृत्यू) मध्ये रामपालसह 13 आरोपी आहेत. त्यापैकी 6 जण दोन्ही प्रकरणांत आरोपी आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...