आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारबालांवर नोटांची उधळण करणाऱ्या ४७ शौकिनांना अटक; जामीन घेण्यासाठी न्यायालयाची अनोखी अट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील डान्स बारमध्ये बारबालांवर नोटांची उधळण करणाऱ्या ४७ शौकिनांना पोलिसांनी रविवारी अटक केली. त्यांचा जामीन घेण्यासाठी शहर न्यायालयाने अनोखीच अट घातली आहे. न्यायालयाने म्हटले, तुमची तुरुंगातून सुटका हवी असेल तर प्रत्येक आरोपीने बदलापूर पोलिस ठाण्यात प्रत्येक अनाथ मुलाला ३ हजार रुपये द्यावे लागतील. मिळालेल्या माहितीनुसार, सत्र न्यायालयाचा अशा प्रकारचा हा पहिलाच अनोखा आदेश असावा. सर्व आरोपींना १.४१ लाख रुपये दंड म्हणून देण्याचे आदेश आहेत. ही रक्कम बदलापूर येथील सत्कर्म बालक आश्रमास दान केली जाणार आहे. एका वृत्तानुसार, पोलिसांनी हाजी अलीजवळ असलेल्या एका बारवर छापा टाकला. या बारचा परवाना गेल्या वर्षी निरस्त करण्यात आला होता. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा ४७ आरोपी बारमध्ये हजर होते. या वेळी ८ बारबाला त्यांच्याभाेवती अश्लील हावभाव करत गाण्यांवर नाचत होत्या. काही लोक त्यांच्यावर नोटा उधळत होते. पण अचानक पोलिस आल्याने रंगाचा भंग झाला, नशाच उतरली.