आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईसमोर विद्यार्थिनीवर चाकूने 22 वार, फेसबूकवर मुलगी बनून केली होती मैत्री, झाली जन्मठेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - पलासिया परिसरातील गीतानगरमध्ये 27 सप्टेंबर 2016 रोजी एकतर्फी प्रेमातून प्रिया रावत हिची हत्या झाली होती. तिची घरात घुसून हत्या करणाऱ्या इंजिनीअरींग विद्यार्थ्याला जिल्हा कोर्टाने जन्मठेप सुनावली आहे. आरोपीने प्रियावर तिच्या आईसमोरच चाकूने 22 वार केले होते. कोर्टाने निर्णयात म्हटले की, आरोपी मृत तरुणीवर प्रेम करत होता, ती बोलली नाही म्हणून त्याने हत्या केली. पुरावे आणि परिस्थिती पाहता हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ रेअरच्या श्रेणीत येत नाही, त्यामुळे मृत्यूदंड देता येत नाही. 


आरोपी अमित उर्फ अथर्व यादव (26) आहे. त्याला 5 हजारांचा दंड आणि मृत तरुणीच्या आईवर हल्ल्याच्या आरोपात एका वर्षाचा तुरुंगवास आणि 1 हजारांचा दंडही ठोठावला आहे. फिर्यादी पक्षाने 16 साक्षीदार सादर करत फाशीची मागणी केली होती. 


या 3 कारणांमुळे समजले नाही रेअरेस्ट ऑफ रेअर प्रकरण 
1. प्रिया आणि आरोपी एकमेकांच्या प्रेमात होते. एकमेकांना मॅसेज पाठवायचे, एकमेकांशी बोलायचे देखिल. 
2. जप्त करण्यात आलेले दस्तऐवज आणि मोबाईलच्या कॉल डिटेल्सवरूनही स्पष्ट झाले आहे की, प्रियादेखिल आरोपीला मॅसेज करत होती. 
3. आरोपीच्या मोबाईल गॅलरीमध्ये त्याचे प्रियाबरोबरचे फोटो आणि व्हिडिओदेखिल आहेत. 


मुलगी समजून पाठवले होते मॅसेज 
प्रियाची आई म्हणाली, मी या शिक्षेवर समाधानी नाही. त्याला मृत्यूदंड मिळायला हवा होता. आरोपी अमितच्या मोबाईलमध्ये प्रियाचे फोटो आणि मॅसेज त्याने मुलगी बनून मैत्री केली तेव्हाचे आहेत. 

 

आरोपीने स्वतः केला युक्तीवाद 
कोर्टात खटला सुरू असताना शेवटच्या काळात आरोपीच्या वकिलाने काही कारणाने खटला सोडला. त्यावेळी तपास अधिकाऱ्यांचे क्रॉस एक्झामिनेशन झाले तर आरोपीने स्वतः युक्तीवाद केला. नंतर कोर्टाने न्यायमित्राच्या स्वरुपात त्याला वकील उपलब्ध करून दिला. 


मुलगी बनून केली होती मैत्रा 
घटनेच्या दिवशी सकाळी 10 वाजता प्रिया कोचिंगहून घरी आली होती. त्यावेळी तिच्या आईने सांगितले की, सकाळी 7.30 वाजता अमित नावाच्या मुलाचा फोन आला होता. तेव्हा प्रियाने सांगितले होते की, या मुलाने फेसबूकवर मुलगी बनून तिच्याशी मैत्री केली होती. आरोपी सकाळी 10.30 वाजता प्रियाच्या घरी पोहोचला तेव्हा प्रिया त्याला रागावली. त्यानंतर तो 5 मिनिटांत निघून गेला, नंतर तिची क्रूरपणे हत्या केली. 

बातम्या आणखी आहेत...