आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाने दिला आदेश

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचा आरोप

सोलापूर- बनावट जातप्रमाणपत्र देऊन फसवणूक केल्याप्रकरणी येथील भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश देत जिल्हा न्यायालयाने याविषयी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी के. पी. जैन-देसरडा यांनी हा आदेश दिला.


मागील सोमवारी अक्कलकोटचे प्रभारी तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर ४ मार्च रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. आज न्यायालयात यावर सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने खासदार स्वामी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जात पडताळणी समितीने त्यांचा जातीचा दाखला रद्द केला होता.


त्यानुसार न्यायालयात खासगी फिर्याद देण्यात आली होती. (कलम १५६/३ - गुन्हा दाखल करून, चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश) त्यानुसार सदर बझार पोलिसांना चौकशी करून पंधरा लाख रुपये जागा खरेदी करून दिल्यानंतर देण्याचे ठरले होते. १३ ऑक्टोबर २०१६ रोजी १५ लाख रुपये रोख दिले. १६ डिसेंबर २०१६ रोजी २० लाख रुपये पुन्हा दिले. परंतु ती जागा अद्यापपर्यंत बिराजदार यांना खरेदी करून दिले नाही. पैसेही परत दिले नाहीत. न वटणारे चेक त्यांना दिले. यामुळे आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण, जिल्हा न्यायालयाने अहवाल मागवला.

बातम्या आणखी आहेत...