Home | Maharashtra | Pune | Court rejects FIR against ACP in police custody: Farrera's in-camera statement

पोलिस कोठडीत एसीपीने मारहाण केल्याचा फरेरांचा न्यायालयात दावा: फरेराचा इन कॅमेरा जबाब

प्रतिनिधी | Update - Nov 07, 2018, 08:46 AM IST

गोन्साल्विस, सुधा भारद्वाज, फरेरा यांना १९ नोव्हेंबरपर्यंत कोठडी

 • Court rejects FIR against ACP in police custody: Farrera's in-camera statement

  पुणे - बंदी असलेल्या सीपीआय माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या अरुण फरेरा यांनी पोलिस कोठडीदरम्यान तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा केला आहे. त्यांनी हा मंगळवारी सत्र न्यायाधीश आर. व्ही. अडोने यांच्या न्यायालयात सुनावणीदरम्यान याबाबत सांगितले.
  दरम्यान अरुण फरेरा, व्हरनॉन गोन्सल्विस आणि सुधा भारद्वाज यांची पोलिस कोठडीची मुदत संपुष्टात आल्याने पोलिसांनी कडक बंदोबस्तात त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले.

  या वेळी सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी संबंधित तिन्ही आरोपींना पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने त्यानुसार तिघांना १९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या वेळी आरोपींनी पाेलिस काेठडीत सुरू असलेल्या वैद्यकीय सुविधा कारागृहातही मिळाव्यात, अशी मागणी केली. न्यायालयाने त्यांची ही मागणी मान्य केली आहे.


  फरेराचा इन कॅमेरा जबाब
  अरुण फरेराने न्यायालयात सांगितले, ४ नोव्हेंबर रोजी स्वारगेट येथील एसीपी कार्यालयात तपास अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी माझ्यासह व्हरनॉन गोन्सल्विस, सुधा भारद्वाज यांची स्वतंत्र चौकशी केली. दोघांच्या चौकशीनंतर माझी चौकशी सुरू करण्यात आली. त्या वेळी तपास अधिकाऱ्यांनी माझा चष्मा काढून मला ताेंडावर मारहाण केली. ५ नोव्हेंबर रोजी ससून रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेले असता डॉक्टरांना मी घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी अहवाल तयार करून त्यात तसे नमूद केले. दरम्यान, तपास अधिकारी डॉ. शिवाजी पवार तपासासाठी बाहेरगावी गेले असल्याने सुनावणीसाठी हजर राहू शकले नाहीत. सरकारी वकील यांनी फरेरा याचा आरोप गंभीर असून त्यांचा इन कॅमेरा जबाब नोंदवावा, अशी मागणी केली. याबाबत १२ नोव्हेंबर रोजी पोलिसांची बाजू न्यायालयात सादर करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

Trending