आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माओवाद्यांशी संबंध : गोन्साल्विस, फरेरा यांना 6 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, महाजन यांनाही अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - माओवाद्यांशी संबंधांचा आरोप असलेल्या व्हर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांना पुणे सत्र न्यायालयाने 6 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी पुणे सत्र न्यायालयावे या दोघांसह सुधा भारद्वाज अशा तिघांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर गोन्साल्विस आणि फरेरा यांना अटक झाली. तर सुधा भारद्वाज यांना फरिदाबादमधून अटक करण्यात आली. 

 

गोन्साल्विस व फरेरा यांना शनिवारी कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर कोर्टाने त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली. या प्रकरणातील अन्य दोन संशयित डॉ. सुरेंद्र गडलिंग आणि शाेमा सेन यांच्या जामीन अर्जावर १ नोव्हेंबर राेजी सुनावणी होणार असून दाेघांच्या अर्जास एक अाठवड्याची स्थगिती न्यायालयाने दिलेली आहे.

#bhimakoregaoncase: Activist and Lawyer Sudha Bhardawaj being taken by Pune Police from her residence in Haryana's Faridabad. Pune Court had rejected her bail plea yesterday pic.twitter.com/Sc8wD5IM0e

— ANI (@ANI) October 27, 2018
नजरकैद वाढवण्यास कोर्टाचा नकार 
दरम्यान, याप्रकरणी आरोपींच्या वतीने पुणे सत्र न्यायालयाच्या या निकाला विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून तिघांच्या नजरकैदेला एक आठवड्याची मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली आहे. 

 


सबळ पुराव्याचा पोलिसांचा दावा 
जप्त कागदपत्रांत आरोपींनी बंदी घालण्यात आलेली संघटना सीपीआय माओवादी यांच्या नेत्यांशी पत्रव्यवहार केल्याचा आणि विविध कारवाईत त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. देशविरोधी कारवाईत त्यांचा सहभाग असल्याचा या सर्वांवर आरोप असून शस्त्रखरेदी आणि सुरक्षा दलांवर हल्ल्याच्या कटाबाबतचे पुरावे त्यांच्याकडे सापडले आहेत, असेही सांगण्यात आले होते. 


एप्रिलमध्ये टाकले होते छापे 
माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून एप्रिल 2018 मध्ये तपास यंत्रणेने देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले होते. त्यावेळी सात जणांच्या घरातून कॉम्प्युटर, लॅपटॉप, मेमरीकार्ड, पेनड्राइव्ह जप्त केले होते. ते तपासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवले. त्यानंतर जून 2018 मध्ये पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा ऑगस्ट 2018 मध्ये एकाचवेळी छापे टाकून अॅड. सुधा भारद्वाज, व्हर्नोन गोन्साल्विस, अरुण फरेरा, गौतम नवलखा, वरवरा राव यांना अटक करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...