आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'छपाक'वर कोर्टाचा निर्णय, 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर'वर चालली सेन्सॉर बोर्डाची कात्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • छपाक : लक्ष्मीच्या वकिलाला क्रेडिट देण्यात यावे
  • तान्हाजी : 30 सेकंद दिसेल डिस्क्लेमर

एंटरटेन्मेंट डेस्कः शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'छपाक' रिलीज झाला आहे. मात्र चित्रपट रिलीज करण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होचा. कारण छपाकच्या विरोधात वकील अपर्णा भट्ट यांनी दिल्ली कोर्टात धाव घेत एक याचिका दाखल केली हाेती. 

  • 'तान्हाजी...' वर चालली सेन्सॉर बोर्डाची कात्री

माहितीनुसार एका सीनमध्ये सैफ अली खानचे पात्र उदयभान म्हणते, 'आणि मी फक्त एक राजपूत.' राजपूत हा शब्द त्यातून काढून टाकला आहे. 'गोली, नौकरानी और नीच खून था तू,' यासारखे शब्द आणि अाेळीदेखील काढण्यात अाल्या आहेत. चित्रपटात एक दश्य होतेे, त्यात उदयभान आपल्या आईची हत्या करताे, ते दृश्यही संपादित करण्यात आले आहे. सैफकडून पुन्हा एक संवादही डबिंग करून घेण्यात आला. याव्यतिरिक्त, सीबीएफसीने अनेक ठिकाणी डिस्क्लेमर लागू करण्याचे सांगितले आहे. मराठा हा शब्द मराठा समाज नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांना संबोधले आहे, असे एका डिस्क्लेमरमध्ये म्हटले आहे. अजय देवगणच्या 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' 10 जानेवारी रोजी रिलीज झाला आहे. यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या काही दृश्यांवर कात्री चालवली आहे. बोर्डाने जेव्हा चित्रपट पाहिला तेव्हा याातील काही दृश्यांवर अाक्षेप घेतला. त्यामुळे ते दृश्य काढण्याचे सांगण्यात आले.    

बातम्या आणखी आहेत...