आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्यापेक्षा धर्म श्रेष्ठ, कोर्टांनी मर्यादा पार करू नयेत; सर्वच मुद्द्यांना समान महत्त्व द्यावे : संघ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- सत्यापेक्षा धर्म श्रेष्ठ असल्याचे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल यांनी केले आहे. ते म्हणाले, ‘न्यायालयांनी मर्यादा ओलांडू  नये. सुप्रीम कोर्टाने सर्वच मुद्द्यांना समान महत्त्व द्यावे आणि राम जन्मभूमीचा वाद लवकर सोडवावा.’ 

 

अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या १५ व्या अधिवेशनात डाॅ.कृष्णगोपाल म्हणाले, ‘आज न्यायमूर्तींचे आचरण आदर्श न्यायाच्या तत्त्वानुसार आहे की नाही, यावर सर्वांनी विचार करावा. भ्रष्ट जज आपल्या फायद्यासाठी समाजासमोर समस्या उभी करतात. यामुळे सर्वसामान्यांचा न्यायावरचा विश्वास उठू लागतो. भारतीय समाजात प्रत्येक व्यक्ती आपल्या अधिकारांबाबत बोलते. भले ती समाजातील कुठलीही व्यक्ती असो. आज मुलांच्या हक्कांसाठीही आयोग स्थापले जाऊ लागले आहेत. पीडितांना न्याय मिळावा म्हणून न्यायव्यवस्थेत आज देशासमोर मूलभूत प्रश्न आहे. तो म्हणजे, न्यायमूर्ती - न्यायालयांंची संख्या किती? प्राचीन न्यायव्यवस्था कर्तव्यांवर आधारित होती. त्या काळी अशी स्थिती अत्यंत अपवादात्मक होती.’

बातम्या आणखी आहेत...