आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुलत बहिणीवरच विवाहित भाऊ करू लागला एकतर्फी प्रेम, मुलीचे दुसरीकडे लग्न ठरताच केले हे लाजिरवाणे कृत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उज्जैन - चुलत बहिणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने तिच्या लग्नामुळे नाराज होऊन बदला घेण्याचे ठरवले. चुलत बहिणीचा फेसबुकवर बनावट आयडी तयार करून अश्लील फोटो अपलोड केले. राज्य सायबर सेलच्या टीमने तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीला अटक केली आहे.

धार जिल्ह्यातील बागमध्ये राहणाऱ्या अमित चौहान (26 वर्षे) याला अटक करून आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. उज्जैनच्या भागसीपुरामध्ये राहणाऱ्या तरुणीने दोन महिन्यांपूर्वी फेसबुकवर बनावट आयडीची तक्रार दाखल केली होती.

 

सायबर सेलचे एसपी शशिकांत शुक्ला यांना सांगितले होते की, फेसबुकवर बनावट आयडी तयार करून अज्ञात आरोपीने एडिट करून त्यावर अश्लील फोटो अपलोड केलेले आहेत. त्यावरून लोकांना फ्रेंड रिक्वेस्टही पाठवण्यात येत आहे.

 

म्हणाली- मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, भाऊ असे करेल...
तक्रारीनंतर सायबर निरीक्षक नरेन्द्र गोमे, हरेन्द्रपालसिंह यांनी आयपी अॅड्रेस ट्रेस करून आरोपीला पकडले. पोलिसांनी सांगितले की, तरुण विवाहित आहे आणि कलरिंगचे दुकान चालवतो. पीडित तरुणी नात्याने त्याची चुलत बहीण लागते. जेव्हा अमितला अटक करण्यात आली तेव्हा ती म्हणाली की, माझा चुलत भाऊच असे काही करेल, याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. आरोपीला कोर्टात हजर करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...