आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cow Called Knickers TOO BIG To Be Killed And Towers Over Rest Of Herd At 6ft 4ins

ही आहे जगातील सर्वात मोठ्या आकाराची गाय, एखाद्या कारपेक्षाही जास्त आहे वजन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्थ- ऑस्ट्रेलियामध्ये एक अवाढव्य गाय सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. काही दिवसांपूर्वी जोफ पीअर्सन याने होल्स्टेन फ्रिसियन जातीच्या गायीला कत्तलखान्यात विकले होते. पण या गायीच्या अवाढव्य आकारामुळे तिचा जीव वाचला. पीअर्सनने कत्तलखान्यातील कामगाराला विचारले तेव्हा त्याने सांगितले की, गायीचा आकार प्रचंड मोठा असल्याने ती मशीनपर्यंत पोहचत नव्हती.

 

संपूर्ण ऑस्ट्रेलियात एकमेव 

> 'स्निकर्स' असे या गायीचे नाव असून ही गाय होल्स्टेन फ्रिसियन जातीतील अन्य गायींपेक्षा जास्त मोठी आहे. गायची उंची 194 सेंटीमीटर (6 फूट 4 इंच) आणि वजन 1400 किलो आहे.
> या 7 वर्षीय गायीची उंची बास्केटबॉलचा सुपरस्टार मायकल जॉर्डनच्या उंचीएवढी आहे. ही गाय ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी गाय असून जगातील सर्वात मोठ्या गायींपैकी एक आहे.
> स्निकर्स सुरवातीपासूनच इतर गायींच्या तुलनेत आकारमानाने मोठी होती. लहानपणापासूनच दिवसेंदिवस तिची उंची आणि वजन इतर गायींपेक्षा वेगाने वाढत होते.
> गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार मार्च 2010 मध्ये रोममधील गायीच्या नावावर जगातील सर्वात मोठी गाय असा असल्याचा विक्रम होता. त्या गायीची उंची 6 फूट 5 इंच होती. 

 

बातम्या आणखी आहेत...