Home | National | Delhi | cowkidar chor hai slogan weak because of Air strike

रणनीती किती प्रभावी? एअर स्ट्राइकमुळे ‘चौकीदार चोर’ घोषणा झाली कमकुवत

हर्ष व्ही. पंत | Update - Apr 12, 2019, 08:43 AM IST

मोदी आणि भाजपचा राष्ट्रवाद, परराष्ट्र धोरणाचा आराखडा लोकांच्या अपेक्षेच्या जास्त जवळ जाणारा

  • cowkidar chor hai slogan weak because of Air strike

    विश्लेषण - निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय सुरक्षा निर्णायक मुद्दा ठरत आहे. याचे अनेकांना आश्चर्य वाटत आहे कारण त्यांनी ही अपेक्षा केली नव्हती. ही निवडणूक बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्येच्या मुद्द्यावर लढवली जाईल, असे तर्क दिले जात होते. मात्र, मतदार फक्त राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर नवे सरकार निवडतील हे स्पष्ट नाही. कारण प्रदीर्घ चालणारी निवडणूक आता कुठे सुरू झाली आहे. पण भारताचे पाकिस्तान धोरण आणि लष्करी दृष्टिकोन यावर सरकार, विरोधक आणि सामान्य जनतेत व्यापक चर्चा होत आहे. पुलवामा हत्याकांडानंतर पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतर निवडणुकीत हा मुद्दा येणार हे निश्चित झाले होते. एअर स्ट्राइक भारताच्या दृष्टिकोनातील बदलाचा मोठा संकेत आहे. आधी पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीवर आंतरराष्ट्रीय समुदाय भारताला तणाव कमी करण्याचे आवाहन करत होता, पण आता कुठपर्यंत जायचे हे पाकिस्तानला ठरवायचे आहे.


    पारंपरिकरीत्या लष्कराच्या वापराचा निर्णय राजकीय नेतृत्वालाच करावा लागतो. त्यामुळे याचे श्रेय सरकारला जात नाही, असे म्हणणेही अतार्किक आहे. भारताच्या दृष्टिकोनातील एक मोठे कारण नरेंद्र मोदी यांचे राजकीय नेतृत्व हेही आहे. विरोधक मोदींकडून हे श्रेय हिसकावू पाहत आहेत, पण ते सोपे आहे का? राजकीय लढाईत राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण आणू नये असे म्हणणे योग्य नाही. कोणता राजकीय पक्ष परराष्ट्रांशी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या आव्हानांशी कसा मुकाबला करेल हे जाणून घेण्याचा अधिकार मतदारांना आहे. अमेरिका, ब्रिटन, जपान आणि ऑस्ट्रेलियासारख्या सर्व लोकशाही देशांत परराष्ट्र धोरणावर जोरदार चर्चा होते. त्यामुळे देशात राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणावरील चर्चेचे स्वागत व्हायला हवे. मोदींनी उभ्या केलेल्या आव्हानांना उत्तर देण्यास काँग्रेस असमर्थ दिसत आहे. काँग्रेस राफेल करार आणि पंतप्रधानांवरील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दाच उपस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे.

    भाजपला सर्वाधिक विश्वास राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रवाद यावरच आहे. त्यामुळे तो पक्ष या मुद्द्यांवरच निवडणूक लढत आहे. विरोधक नोकऱ्या, शेतकरी समस्या या मुद्द्यांवर सरकारला घेरण्यात अपयशी ठरले. मोदीच राजकीय पटकथा लिहीत आहेत, विरोधक त्याला फक्त उत्तर देत आहेत.

Trending