आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cows Arteries Transplanted To The Liver, 14 Hours To Surgery, 2 Weeks To Get Discharge

यकृतापर्यंत रक्त जाण्यासाठी लावल्या गायीच्या धमन्या, 14 तास शस्त्रक्रिया, 2 आठवड्यांनंतर सुटी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहानगी हूर - Divya Marathi
लहानगी हूर
  • हरियाणा : गुरुग्राममध्ये सौदी अरबच्या एक वर्षाच्या मुलीचे दुर्मिळ असे यकृत प्रत्यारोपण
  • परदेशातून आणल्या गायीच्या धमन्या : डॉक्टर

​​​​​गुरुग्राम : दिल्लीलगत असलेल्या हरियाणातील गुरुग्रामच्या खासगी रुग्णालयात जगातील पहिली व दुर्मिळ असे यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. यासाठी गायीच्या धमन्यांचा वापर करण्यात आला. याचे प्रत्यारोपण सौदी अरबच्या एक वर्षाच्या मुलीवर करण्यात आले. ही शस्त्रक्रिया तब्बल १४ तास चालली. तिला दोन आठवडे डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. बुधवारी तिला सुटी देण्यात आली. यकृताचे प्रत्यारोपण करणाऱ्या सर्जन डॉ. गिरिराज बोरा यांनी सांगितले, मुलीचा जन्म बाइल डक्ट्सशिवाय झाला होता. तिची पोर्टल नस (पित्तनलिका) विकसित झालेली नव्हती. यामुळे शस्त्रक्रियेसाठी (बोवाइन जग्युलर धमन्या )गायीच्या गळ्याच्या धमन्यांचा वापर करण्यात आला. या धमन्या नव्या यकृतात रक्त पोहोचवण्याचे काम करतात. शस्त्रक्रियेदरम्यान मुलीकडे लक्ष देणे खूप आव्हानात्मक होते. डॉक्टर्स व पॅरामेडिकल गटाने तिची खूप काळजी घेतली. हूर साराह व अहमद यांचे तिसरे अपत्य होते. जन्मानंतर तीन महिन्यांतच तिला गंभीर आजार झाला. सौदीचे डॉक्टर्स जोखीम घेण्यास तयार नव्हते. बिलियरी बायपास सर्जरीच्या अपयशानंतर त्यांनी भारतात शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता.

१६ हजार नवजातांमधून एकास होतो असा आजार

डॉ. बोरा म्हणाले, सौदीच्या डॉक्टरांनी मुलगी बिलियरी अॅट्रेसिया आजार असल्याचे निदान केले. हा अाजार १६ हजारांत एका नवजातास होतो. अशा मुलांमध्ये बाइल डक्ट्सचा (पित्तनलिका)विकास झालेला नसतो. मुलीचे वजन ५.२ किलो होते. प्रत्यारोपणाची क्रिया खूप अवघड होती. आता ती चांगली आहे