आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरब देशांनी केली होती या मुस्लिम राष्ट्राची नाकेबंदी, आर्थिक कोंडीनंतर गायींनी सावरले!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोहा - कतारची ओळख जगातील सर्वात धनाढ्य देशांपैकी एक अशी आहे. इतर आखाती देशांशी शत्रुत्वाने सुद्धा या देशाला अधिक मजबूत आणि धनाढ्य बनवले आहे. या विकसित देशात एकही दूध डेअरी नव्हती. सौदी अरेबियाशी संबंध बिघडले, तेव्हाच या देशात वातानुकुलित गोशाला उघडण्यात आल्या. दूध काढण्यासाठी मशीनी लावण्यात आल्या. कतारच्या बलाडना फार्महाऊसमध्ये तर तब्बल 10 हजार गायी आहेत. यातून मिळणारे दूध केवळ देशातच नव्हे, तर अमेरिकेत सुद्धा निर्यात केले जाते.


बंद झाला होता जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा...
- आखाती संकट सुरु होताच अरब देशांनी कतारची नाकेबंदी केली. जीवनावश्यक वस्तूंची आयात आणि निर्यात थांबवून कतारची कोंडी केली. कतार दूधासाठी पूर्णपणे सौदी अरेबियावर विसंबून होता. मात्र, सौदी अरेबियाने त्याचा पुरवठा सुद्धा बंद केला. 
- तरीही कतारने ही सर्व आव्हाने पेलून पुढे जाणेच पसंत केले. संकटापासून सावरताना एका महिन्यातच कतार एयरवेजच्या विमानांनी मोठ्या प्रमाणात गायी देशात आणल्या गेल्या. 
- बलडाना फार्मचे व्यवस्थापक पीटर वेल्टव्रेडन यांनी सांगितले, सर्वांनी म्हटले होते की दूधाची कमतरता भरणे अशक्य ठरेल. पण आम्ही ती अशक्य गोष्ट करून दाखवली. संकटापासून अवघ्या वर्षभरात आम्ही इतके दुग्ध उत्पादन केले की देश आत्मनिर्भर झाला.


असे आहे प्रकरण...
उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या वर्षी जून महिन्यात सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, बहरेन आणि इजिप्तने कतारसोबतचे मुत्सद्दी, औद्योगिक आणि दळण-वळण संबंध तोडले होते. या सर्व देशांनी कतारवर कट्टरपंथी संघटनांना प्रोत्साहित करणे, क्षेत्रात अस्थिरता निर्माण करणे, तसेच अरब देशांचे कट्टर शत्रू इराणशी जवळिक साधणे असे आरोप लावले होते. कतारने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसेच या देशांपुढे वाकण्यास स्पष्ट नकार दिला होता. कतारने या देशांकडून झालेली कोंडी एक आव्हान म्हणून स्वीकारले. आणि एका वर्षात या देशाने इतर देशांना सुद्धा दूध पुरवठा सुरू केला.


नवीन बंदराची निर्मिती
एवढेच नव्हे, तर आर्थिक नाकेबंदी झाल्यानंतर या देशाने स्वतःचा मार्ग बनवला. कित्येक अब्ज डॉलर खर्च करून कतारने एक नवीन बंदराची निर्मिती केली. यातूनच 2022 च्या फुटबॉल वर्ल्डकपसाठी स्टेडिअम आणि इमारती उभारल्या जातील.


इराणशी जवळिक
इतर मुस्लिम देशांनी कोंडी केल्यानंतर कतार आणि इराण जवळ आले आहेत. इतर देशांचे मार्ग बंद झाले तेव्हा फक्त इराण सागरी सीमा हा एकमेव मार्ग कतारसाठी उरला होता. त्याच ठिकाणी असलेल्या इराणच्या हवाई हद्दीतून कतारने आपला विमान प्रवास सुरू ठेवला. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे, इराण आमचा शेजारी आहे. त्यामुळे, त्यांच्यासोबत संबंध ठेवावेच लागतील.

बातम्या आणखी आहेत...