आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी रशियात गायींना व्हीआर हेडसेट घातले गेले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को : जास्त दुग्ध उत्पादनासाठी रूसमध्ये गायींना व्हर्चुअल रिएलिटी (व्हीआर) हेडसेट घातले जात आहेत. ही सुरुवात खाद्य मंत्रालयाने केली आहे.  शेतकरी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, यामुळे गायींचा मूड चांगला आणि दुग्ध उत्पादन जास्त होते की नाही. व्हीआर हेडसेटद्वारे प्राण्यांना आवडणाऱ्या रंगांसोबत चाऱ्याचे मैदान दाखवले गेले. पहिल्या परीक्षणामध्ये गायींची एंग्जायटी कमी झाली. 


तज्ञांचे म्हणणे आहे की, व्हीआर हेडसेट, रोबोट्स आणि ड्रोन्स यांसारख्या टेक्निकमुळे डेअरी आणि पशुपालनात क्रांती आली आहे. व्हीआर हेडसेट टेक्निकच्या साहाय्याने गायींची अस्वस्थता आणि स्वास्थ्यासंबंधी समस्या कमी करण्यात मदत मिळणार आहे. 

रूसचे वातावरणही गायींसाठी अनुकूल नाही...  


तज्ञांचे म्हणणे आहे की, रूसमध्ये जास्तीत जास्त वेळ खूप थंडी पडते. हिमवर्षावही जास्त होतो. यामुळे जवळपास हिरवळ राहात नाही. यामुळे गायींना जसे वातावरण पाहिजे तसे मिळत नाही. त्यांना हिरवळीचे मैदान आणि फिरण्यासाठी जागा मिळत नाही. यामुळे दुग्ध उत्पादनावर परिणाम होतो. गायींमध्ये एंग्जायटी वाढते. व्हीआर हेडसेटद्वारे गायींना रोज हिरवे मैदान भासवले जाऊ शकते आणि त्या तिथे फिरू शकतात. यादरम्यान त्यांना 360 डिग्री व्ह्यू मिळतो. 

गायींना आनंदी ठेवण्यासाठी अनेक उपाय केले...  


डेअरी क्षेत्रात गायीची मानसिक स्थिती उत्तम करण्यासाठी वेळोवेळो अनेक पद्धती वापरल्या जातात. जसे त्यांना संगीत ऐकवले जाते. एक चांगला मित्र म्हणून त्यांच्यासोबत वेळ घालवल्यामुळे त्यांना भावनिकदृष्ट्या कणखर बनवले जाते. वासराच्या जन्मानंतर त्याला गायीपासून दूर ठेवले जाते जेणेकरून त्यांच्यामध्ये भावनिक नाते निर्माण होऊ नये आणि दूर असल्यावर गायी अस्वस्थ होऊ नये. 

बातम्या आणखी आहेत...