आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Crash Landing In Iran ; The Snow capped Aircraft Crashed Directly Into The Fields

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमान उतरताना अपघात; बर्फामुळे घसरलेले विमान घुसले थेट शेतात, आठवड्यातील दुसरी घटना

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

केरमानशाह - इराणच्या केरमानशाहमध्ये उतरता उतरता एक प्रवासी विमान शेतातच उतरले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, धावपट्टीवर बर्फ जमला हाेता. त्यामुळे विमान घसरले आणि ३० फुटावरील शेतात जाऊन पाेहचले. या घटनेत काेणत्याही प्रकारे नुकसान झालेले नाही. विमानात १०२ प्रवाशांसह ११० जण हाेते. यात वैमानिक आणि क्रू हाेते. सर्व सुरक्षित आहेत. घटनास्थळी आपत्कालिन सेवा देण्यात आली आहे. इराणमध्ये एका आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. 

याच आठवड्यात १३५ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान रस्त्यावर उतरले हाेते


या आधी २७ जानेवारीला इराणच्या माहशहरमध्ये १३५ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान भर रस्त्यावर उतरले हाेते. या दुर्घटनेत सर्व यात्री बचावले हाेते. या अपघातानंतर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या.