आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रेजी रिच एशियन्स: 21 सप्टेंबरला भारतात रिलीज होणार, कादंबरीतील कथेवर आधारित आहे चित्रपट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड डेस्क: जगभरात सर्वात जास्त कमाई केलेला रोमँटिक कॉमेडी चित्रपट क्रेजी रिच एशियन्स भारतात रिलीज होणार आहे. चित्रपटाचे वर्ल्ड वाइड डिस्ट्रीब्यूटर्स वार्नर ब्रदर्सच्या इंडियन ट्विटर हँडलने चित्रपट रिलीज डेट डिक्लेअर केली आहे. हा चित्रपट 21 सप्टेंबरला भारतात रिलीज होणार आहे. 

 

ऑगस्टमध्ये कँसल झाली होती डेट 
यापुर्वी ऑगस्टमध्ये वार्नर ब्रदर्सने चित्रपट भारतात रिलीज करण्यास नकार दिला होता. त्यांनी आपल्या ट्विटर हँडवल लिहिले होते की, क्रेजी रिच एशियन भारतात रिलीज होणार नाही, हे सांगताना आम्हाला दुःख होतेय.

 

30 मिलिनय डॉलर होते बजेट 
चित्रपटाचे डायरेक्शन अमेरिकी डायरेक्टर जॉन एम चू यांनी केले आहे. चित्रपटाचे एकुण बजेट 30 मिलियन डॉलर होते. चित्रपटाची कथा आणि प्रेजेंटेशनमुळे जगभरात चित्रपटाला खुप पसंती मिळाली होती. चित्रपटाची वर्ल्ड वाइड कमाई 188 मिलियन डॉलरपेक्षा जास्त झाली आहे. 


ही आहे चित्रपटाची स्टार कास्ट 
चित्रपटाची लीड अॅक्ट्रेस कॉन्सटेंस वू, अॅक्टर हेनरी गोल्डिंग, मिशेल यो, गेमा चेन आहेत. चित्रपटाचे यश पाहता ऑगस्ट 2018 मध्ये याचे स्वीक्वल बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे. 2020 मध्ये याची शूटिंग सुरु होऊ शकते.
 

बातम्या आणखी आहेत...