आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TikTok : कार्यालयात टिकटॉक व्हिडिओ तयार केल्याने ११ कर्मचाऱ्यांचा १० दिवसांचा पगार कापला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - तेलंगणातील खम्मम महापालिका कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी टिकटॉक व्हिडिओ तयार केला होता. व्हिडिओ तयार करणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांचा १० दिवसांचा पगार कापण्यात आला आहे. हे कर्मचारी रोजंदारीवर काम करणारे होते. महापालिका आयुक्त जे. श्रीनिवास राव यांनी या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देत त्यांची एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली केली आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेरील कामे दिली आहेत. तसेच डाटा एंट्री कर्मचाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे. टिकटॉकवर तयार केलेला व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये महिला कर्मचारीही आहेत. यानंतर अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना ओळखले आणि त्यांना शिक्षा करण्याचा निर्णय घेतला.