आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेक्निकल होत चाललेल्या दिवाळीवर विशेष भाष्य करते ही शॉर्टफिल्म, पाहा..मिळेल सकारात्मक संदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. Creatives kida Production ने "Technical Diwali" ही फिल्म प्रदर्शित करण्यात आली आहे. सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या दुनियेत आपण सर्व सण तर साजरे करतो.  परंतु यात आपल्या सोबतीला आपली माणसे किती आणि ही टेक्निकल गॅजेट्स किती  हे नक्कीच पडताळून पाहायला हवं.

 

आपला पूर्ण वेळ हा नक्कीच आपल्यासाठी नसतो. आपण आपल्यासाठी जगत नाही. आपण या टेक्नॉलॉजीच्या जगात स्वतः ला विसरत चाललो आहोत हे तितकेच खरं आहे. आजच्या घडीला हे टेक्नॉलॉजीचे कठीण जाळे विणनारा कोळी तरं आपणच आहोत. परंतु त्यात आपणच सावज म्हणून अडकून पडलोय किमान याचा शोध नक्कीच घ्यायला हवा. म्हणून दिवाळी विशेषमध्ये ही छोटीशी 3 मिनिटांची फिल्म Creatives कीडा प्रोडक्शनने केलेला प्रयत्न आहे.

 

या शॉर्टफिल्मचे लेखन आणि दिग्दर्शन प्रल्हाद जाधव यांनी केले आहे. तर अभियन  श्रीश खेडेकर, निहार सप्रे, अनुजा कांगणे, तुळसा वाशिलकर यांनी केला आहे. छायाचित्रण पीटर इंगळे यांचे आहे. संकलक विशाल शिवनखेडकर आहेत. सहाय्यक दिग्दर्शक तुषार वाशिलकर तर मेकअपर कोमल वाघमारे यांचा आहे. प्रोडक्शन मॅनेजर मनु निळे (मनोज सुकलाल निळे) तर तांत्रिक साहाय्य प्रकाश सदाफुले, कपिल कोंडाळवाडे, स्वप्निल कांगणे यांचे आहे. डॉ. राजेंद्र खेडेकर व खेडेकर परिवार यांचे विशेष सहकार्य आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...