आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक क्रेडिट कार्डची ऑफर देत आहे का? अवश्य विचारुन घ्या हे 6 प्रश्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : क्रेडिट कार्ड बनवून घेण्यासाठी बँकेतून तुम्हाला नेहमीच कॉल येत असेल. ते तुम्हाला विविध ऑफर देऊन कार्ड बनवून घेण्यास सांगत असतील. अशा वेळी तुम्हाला क्रेडिट कार्ड बनवायचे असेल आणि तुम्हाला बँकेतून कॉल आला तर त्याला कोणते प्रश्न विचारावे याविषयी बँकबाजार डॉट कॉमचे सीईओ आदिल शेट्टी सांगत आहेत. 


ऑफरचा पुरवा मागा 
तुम्हाला टेलीमार्केटिंग करणा-याचा फोन आला. आणि तुम्हाला क्रेडिट कार्ड तुम्हाला बनवायचे असेल तर सर्वात पहिले त्यांच्या ऑफर्सवर तुम्ही लक्ष द्या. अनेक वेळा ग्राहक ऑफर पुर्णपणे समजून घेत नाही आणि कार्ड घेतात. नंतर तुम्हाला कळते की, जी ऑफर दिली आहे ती तुमच्या फायनेंशियल प्लानिंग आणि लाइफस्टाइलमध्ये बसत नाही. यासोबतच जे सर्वात जास्त बोलले जाते ते म्हणजे कार्ड पुर्णपणे चार्ज फ्री आहे. म्हणजेच त्याची अॅन्युअल फीस झिरो असावी. जर टेलीमार्केटिंग करणारा व्यक्ती असे बोलला तर त्याचा पुर्ण पुरावा मागा आणि ऑफरची लिखित कॉपी घ्या. कारण ते तुम्हाला फक्त बोलून लालूच देत असतात. नंतर ते स्टेटमेंटसोबत चार्ज लावून देतात. अशा वेळी ऑफरचा लिखित पुरावा मागावा. 

 

तुम्हाला काय खरेदी करायचे आहे ते ठरवा
तुम्हाला फोन करणा-या व्यक्तीचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे कार्ड विकणे. अशा वेळी तो काय विकतो आहे हे तुम्हाला माहिती असावे. तो जे कार्ड तुम्हाला विकतोय त्याचा तुम्हाला फायदा होणार की नाही हे तुम्ही तपासून घ्यावे. उदाहरण म्हणजे - जर तुम्हाला प्रवासासाठी एक एयर माइल्स क्रेडिट कार्ड घ्यायचे आहे. परंतू टेलीमार्केटिंगच्या माध्यमातून तुम्हाला कार्ड विकणारा व्यक्ती लाइफस्टाइल कार्ड निवडण्यास सांगत आहे, ज्यामध्ये शॉपिंग आणि बाहेर खाण्यात सूट आणि रिवॉर्ड पॉइंट मिळेल. तर अशा वेळी हे कार्ड घेऊन काहीच फायदा होणार नाही.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या सविस्तर...

 

बातम्या आणखी आहेत...