आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • People Thought It Was A Trees Root Or Some Kind Of Vegetable, But The Creepy Thing Started Moving And People Are Baffled

समुद्र किना-यावर वाहत आलेला जीव पाहून घाबरले लोक, आधी वाटले झाडांची मुळे असतील, नंतर काही क्षणांतच होऊ लागली हालचाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिएतनाम- दक्षिण व्हिएतनामच्‍या समुद्र किना-यावर एक असा जीव वाहत आला आहे, ज्‍याला पाहून येथील लोकांची घाबरगुंडी उडाली आहे. आधी लोकांना वाटले की, एखाद्या झाडाची ही मुळ असतील. मात्र थोड्याच वेळात याची हालचाल होऊ लागली. आणि पाहता पाहता या जीवाचे संपूर्ण शरीर हालचाल करू लागले. हे पाहून येथील लोक सुरूवातीला हैरान झाले, नंतर त्‍याचा व्हिडिओ बनवण्‍यास त्‍यांनी सुरूवात केली. व्हिडिओमध्‍ये या जीवाचे सुमारे डझनभर अंग हालचाल करताना दिसत आहे.

 

लोकल टुरिस्‍टने सांगितले असे

- याचा व्हिडिओ एका लोकल टूरिस्‍टने शेअर केला आहे. डु नामडू नावाच्‍या टूरिस्‍टने याविषयी सांगितले की, 'आम्‍ही किना-यावर पहूडत होतो तेव्‍हाच अजीब दिसणा-या या वस्‍तूवर आमची नजर गेली. मी अनेकांना ही वस्‍तू पाहण्‍यासाठी बोलावले मात्र कोणीही याबद्दल सांगू शकले नाही. आम्‍हाला वाटले ही एखाद्या झाडाची मुळ असतील. याला टेबलावर ठेवून आम्‍ही याचे फोटो काढू लागलो, तेव्‍हा ही वस्‍तू हलू लागली. याचे असंख्‍य पाय होते. ते सर्व हालचाल करू लागले. अद्यापही आम्‍हाला कळाले नाही की, हा जीव नेमका आहे कोणता.


समुद्री दैत्‍यचा अंग  
या जीवाबद्दल आता अनेक अफवा पसरण्‍यास सुरूवात झाली आहे. काही लोकांचे म्‍हणणे आहे, समुद्रात राहणा-या एका दैत्‍याचे हे काही अंग आहेत. किम नाम नावाच्‍या एका व्‍यक्‍तीने तर म्‍हटले आहे की, समुद्रात राहणारा हा दैत्‍य खूप मोठा आहे आणि बाहेर येऊन तो आपल्‍यावर कधीही हल्‍ला करू शकतो.


समुद्री गवत तर नाही
वैज्ञानिकांनाही हा जीव नेमका आहे कोणता याबद्दल अद्याप काही सांगता आलेले नाही, मात्र  हे एखादे समुद्री गवत असावे, अशी शक्‍यता त्‍यांनी वर्तविली आहे. हवेच्‍या संपर्कात आल्‍याने यात काही रिअॅक्‍शन झाले असावे त्‍यामुळे ते अशा पद्धतीने हलत असावे, असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा त्या विचीत्र जीवाचा व्हिडिओ..

बातम्या आणखी आहेत...