52 वर्षांपासून या / 52 वर्षांपासून या जागेला भुयार समजण्याची चूक करत होते लोक, त्यानंतर एक व्यक्ती गेला आतमध्ये

आतमध्ये होत्या अशा काही वस्तू, ज्याविषयी कोणालाच काही माहिती नाही

Feb 12,2019 02:23:00 PM IST

इंग्लंडमधील डार्टमूर येथील एका जागा चर्चेचा विषय बनली आहे. जवळपास 52 वर्षांपासून लोक या ठिकाणाला भुयार समजत होते. काही लोक ही जागा झपाटलेली मनात होते आणि इकडे कोणी फिरकतही नव्हते. परंतु आता या जागेचे चकित करणारे सत्य समोर आले आहे. काही वर्षांपूर्वी ही जागा खरेदी करणाऱ्या नील वरेल नावाच्या व्यक्तीने या जागेखाली असलेले सत्य समोर आणले आहे.


- 2014 मध्ये ही जागा खरेदी करणाऱ्या नील वरेलने सांगिलते की, त्यालाही सुरुवातीला हे भुयार वाटले होते. पहिल्यांदा यामध्ये गेल्यानंतर त्याला खूप भीती वाटली. परंतु नंतर त्याच्या लक्षात आले की, हे भुयार नसून एक बंकर आहे. येथे जमिनीच्या खाली 100 फूटपेक्षा जास्त जागेत मोठ्या-मोठ्या मशीन लावलेल्या होत्या. येथे जमिनीच्या खाली वॉटर फिल्टर लावलेले होते. जवळपासच्या भागातील पाणी येथे जमा व्हायचे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, याविषयी कोणालाच काही माहिती नव्हते.


- रिपोर्ट्सनुसार, या प्लांटचे डिझाईन अशाप्रकारे केले होते की, येथून जवळपास असलेल्या पर्वताचे पाणी मुरून जमिनीच्या खाली असलेल्या भीमकाय टॅंकमध्ये जमा व्हायचे. त्यानंतर फिल्टर्सच्या मदतीने हे पाणी पिण्यायोग्य बनवून जवळपास असलेल्या भागात सप्लाय केले जायचे. परंतु 1960 मध्ये काही कारणांमुळे हा प्लांट बंद पडला आणि तेव्हापासून हे ठिकाण ओसाड झाले.

X