आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cricket Analysis | Why Is It All Over The Bat? So Far, In The Three Semifinals, Sumer Batted

सगळी मदार फलंदाजीवरच का? आतापर्यंत तिन्ही सेमीफायनलमध्ये सुमार फलंदाजीने टीमचा पराभव

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - भारतीय महिला संघाने चाैथ्यांदा टी-२० विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. मात्र, टीमला आतापर्यंत एकदाही अंतिम फेरीचा पल्ला गाठता आला नाही. भारताचा महिला संघ २००९, २०१० आणि २०१८ मधील विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दाखल झाला हाेता. या तिन्ही सामन्यांत १२० धावांचा स्काेअरही भारताला करता आला नाही. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत अंितम फेरी गाठणाऱ्या भारतीय संघाला फलंदाजीचा दर्जा उंचावणे आवश्यक आहे. लीगच्या चारही  सामन्यांत भारताला १५० धावांचा आकडाही गाठता आला नाही. बांगलादेशविरुद्ध भारताने १४२ धावांचा सर्वाेत्तम स्काेअर नाेंद केला. येत्या गुरुवारी भारताचा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका वा इंग्लंड यांच्याशी हाेऊ शकेल. आॅस्ट्रेलिया संघानेही उपांत्य फेरी गाठली आहे. 

उपांत्य सामन्यात ११९ धावांचा सर्वाेत्तम स्काेअर :


भारताचा २००९ विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ९३ धावांचा स्काेअर  हाेता. २०१० मध्ये ११९ व २०१८ मध्ये ११२ धावसंख्येची नाेंद भारताला करता आली. यात भारताच्या एकाही खेळाडूची अर्धशतकी खेळी नाही.
> 02 शतके आतापर्यंत या विश्वचषकात नाेंद झाली. एका स्पर्धेतील हे सर्वाधिक ठरले. हे यश इंग्लंडच्या हीथर आणि आफ्रिकेच्या लिजेलने मिळवले. 

> 202 धावा इंग्लंडच्या नतालिया सीवरने आतापर्यंत स्पर्धेत काढल्या आहेत. हे सर्वाधिक. हीथर (१९३)  दुसऱ्या आणि भारताची शेफाली वर्मा (१६१) तिसऱ्या स्थानावर आहे.  

> 67 षटकारांची यंदाच्या विश्वचषकात नाेंद झाली. हे १८ सामन्यांत झळकले. प्रत्येक सामन्यात ३.७ षटके. अद्याप पाच सामने बाकी. गत स्पर्धेत ७५ षटकार.

टीमचे गाेलंदाज फाॅर्मात,  १६ व्या चेंडूवर विके

विश्वचषकात भारताचे गाेलंदाज अव्वल कामगिरी करत आहेत. भारताची फिरकीपटू पूनम यादव आघाडीवर आहे. तिने आतापर्यंत ९ विकेट घेतल्या. भारताच्या गाेेलंदाजांनी आतापर्यंत सर्वाधिक ३० विकेट घेतल्या आहेत. यात इंग्लंडला २७ आणि आॅस्ट्रेलियन संघाला २४ बळी घेता आले.  भारताच्या गाेलंदाजांचा स्ट्राइक रेट सर्वात कमी १६ असा आहे. प्रत्येक १६ व्या चेंडूवर  भारताच्या गाेलंदाजांनी विकेट घेतली आहे.  इंग्लंडचा स्ट्राइक रेट १७, आफ्रिकेचा १८ आणि आॅस्ट्रेलियाच २० आहे. स्मृती, हरमनप्रीतकडून निराशा 

भारतीय संघातील सीनियरने सर्वात निराशा केली. स्मृती आणि कर्णधार हरमनप्रीतचा समावेश आहे. स्मृतीने तीन सामन्यांत १३ च्या सरासरीने अवघ्या ३८ धावा काढल्या. तिची सर्वाेत्तम खेळी १७ धावांची ठरली. तसेच हरमनप्रीतने ६.५० च्या सरासरीने २६ धावा काढल्या. तिची १५ धावांची सर्वाेत्तम खेळी नाेंद आहे. १६ वर्षीय शेफालीने चार सामन्यांत सर्वाधिक १६१ धावा काढल्या आहेत.