आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cricket | Chief Selector Of Indian Cricket Team MSK Prasad Says No Update On MS Dhoni's Retirement

महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबतच्या बातम्या केवळ अफवा, आमच्याकडे याबाबत कोणतेही अपडेट नाहीत - मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या बातम्या अफवा असल्याचे म्हटले आहे. धोनीच्या निवृत्तीबाबत त्यांच्याकडे कोणतेही अपडेट नसल्याचे त्यांनी सांगितले. महेंद्र सिंह धोनी गुरुवारी संध्याकाळी पत्रकार परिषद बोलावणार असल्याची बातमी गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर पसरत आहे. यामध्ये तो आपली निवृत्ती जाहीर करू शकतो असे या बातम्यांमध्ये सांगण्यात येत आहे.  

विराटने ट्वीट केला धोनीसोबतचा एक फोटो
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी सकाळी धोनीसोबतचा एक फोटो ट्वीटवर शेअर केला होता. या फोटोत विराट गुडघ्यावर बसून धोनीसमोर नतमस्तक होताना दिसत आहे. हा फोटो 2016 मध्ये टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवल्यानंतरचा होता. या सामन्यात भारतानने ऑस्ट्रेलियाचा 6 गड्यांनी पराभव केला होता. कोहलीने फोटो ट्वीट करत लिहीले की, 'हा सामना मी कधीच विसरु शकत नाही. त्या रात्री एका माणसाने (धोनी) मला माझी फिटनेस टेस्ट असल्यासारखे पळवले होते.'

सोशल मीडियावर पसरली धोनीच्या पत्रकार परिषदेची अफवा
विराट कोहलीच्या या ट्वीटवर शिवाशीष एक चाहत्याने लिहिले की, 'आम्ही सध्या धोनीच्या निवृत्तीसाठी तयार नाहीत.' तर रोहिलत सेल्वाकुमार नावाच्या एका अकाउंटने पोस्ट केली की,'धोनीने संध्याकाळी 7 वाजता पत्रकार परिषद बोलवली आहे. यावेळी ते आपल्या निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे.'