आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-आफ्रिका मालिकेवर कोरोनाचे सावट, चेंडू चमकवण्यासाठी खेळाडू थुंकी लावणार नाहीत, हस्तांदोलनाऐवजी मुठीने अभिवादन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मास्कमध्ये यजुवेंद्र चहल - Divya Marathi
मास्कमध्ये यजुवेंद्र चहल
  • भारत-द.आफ्रिकेतील पहिला वनडे आज, प्रेक्षकांची पाठ, तिकीट विक्रीत ४०% घट
  • वर्ल्ड XI आणि आशिया XI सामना पुढे ढकलला

धर्मशाळा - भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ वनडे मालिकेतील पहिला सामना धर्मशाळा येथे गुरुवारी होत आहे. मालिकेवर कोरोनाचे सावट दिसत आहे. दोन्ही संघांचे खेळाडू हस्तांदोलन टाळून एकमेकांच्या मुठीने अभिवादन करतील. असे घडण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल. याशिवाय चेंडूची चमक कायम राहावी यासाठी खेळाडू चेंडूला थुंकी लावतात. यामुळे चेंडू स्विंग व स्पिन होण्यास मदत मिळते. मात्र आता खेळाडू चेंडूला थुंकी लावणे टाळतील. सामन्यापूर्वी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने म्हणाला, आरोग्य, स्वच्छता लक्षात घेऊन चेंडू चमकवण्यासाठी थुंकी लावणे टाळू. द.आफ्रिकेचा कर्णधार डिकॉक म्हणतो की, आम्ही कोरोनाची तपासणी केली आहे. डॉक्टरांचा चमूही सोबत आहे. आम्हाला चिंता नाही. याशिवाय भारतीय क्रिकेट मंडळाने संघाचे खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी गाइडलाइन जारी केल्या. त्यानुसार, खेळाडूंना किमान २० सेकंद हात धुण्याचे निर्देश आहेत. शिंका आणि खोकताना चेहरा झाकण्यास सांगितले आहे. रेस्तराँत खाण्यास बंदी घालण्यात आली आहे. फॅन्सशी हस्तांदोलन टाळणे, त्यांच्यासमवेत सेल्फी घेताना सुरक्षित अंतर ठेवण्याचे निर्देश आहेत. दुसरीकडे प्रक्षेपण व काॅर्पोरेट जगतानेही स्टेडियमकडे पाठ फिरवली आहे. सामन्यापूर्वी बुधवारपर्यंत सुमारे ६०% तिकिटांची विक्री झाली होती. धर्मशाळाच्या मैदानात १२ कॉर्पोरेट बॉक्स आहेत. यापैकी ३ बॉक्स बुक झाले आहेत. एकूण १२ जणांच्या क्षमतेचा हा बॉक्स २ लाख रुपयांत बुक होतो. 
हिमाचल क्रिकेट संघटनेचे महाव्यवस्थापक कर्नल एच.एस. मन्हास यांच्या मते, प्रत्येक प्रेक्षकाची स्कॅनिंग होईल. वैद्यकीय तपासणीनंतरच त्यांना प्रवेश दिला जाईल. मैदानात एकही संसर्ग झालेली व्यक्ती नसेल याची काळजी घेऊ. एखाद्याला तसे वाटत असेल तर त्यासाठी वैद्यकीय चमू सज्ज असेल. वर्ल्ड XI आणि आशिया XI सामना पुढे ढकलला 


बांगलादेश क्रिकेट मंडळाने संस्थापक शेख मुजीबूर रहमान यांच्या जन्मदिनी २१ आणि २२ मार्चला वर्ल्ड इलेव्हन व आशिया इलेव्हन यांच्यातील सामने पुढे ढकलले आहेत. यात विराट कोहली, मलिंगा, ख्रिस गेलसारखे दिग्गज खेळाडू खेळणार होते. मात्र मंडळाचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी बुधवारी सांगितले की, हे सामने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...