आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेंद्रसिंह धोनी - केदार जाधवच्या संथ फलंदाजीमुळे भारताचा पराभव; दिग्गजांनी दोघांवर केली टीका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क - रविवारी आयसीसी विश्वचषकात इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला. धोनी पुन्हा एकदा कमी गतीने खेळल्यामुळे दिग्गजांच्या निशान्यावर आला आहे. कोहलीने पराभवाचे खापर फलंजादांवर फोडले आहे. इंग्लंडने दिलेल्या 337 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर फलंदाज के.एल.राहुल भोपळाही न फोडता बाद झाला. रोहित शर्माने मात्र शतक झळकावले. 

 

संथ खेळीमुळे धोनी पुन्हा एकदा अडचणीत 
भारताच्या पराभवानंतर महेंद्रसिंह धोनीच्या खेळीवर पुन्हा एकदा टीका होत आहे. यावेळी अनेक दिग्गज खेळाडूंनी धोनी आणि केदार जाधवच्या संथ खेळीवर प्रश्न उठवला आहे. भारताला विजयासाठी 31 चेंडूत 71 धावांची गरज होती. पण धोनी-जाधव यांची भागीदारीचा भारताला काहीही उपयोग झाला नाही. इतकेच नाही दोघांचा खेळ पाहून ते जिंकण्यासाठी खेळत आहेत असेही वाटत नव्हते. 
 

सौरव गांगुलीने केली टीका 
धोनीने 31 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 42 धावा काढल्या. तर केदार जाधवने 12 चेंडूत फक्त 13 धावा केल्या. दोघांच्या अशा या कामगिरीवर नाराज होऊन सौरव गांगुली म्हणाला की, 'तुमच्याकडे 5 गडी शिल्लक असताना तुम्ही जिंकण्यसाठी प्रयत्न करत नाहीत. हे सर्व माइंड सेट असल्याचे दर्शवते.' याअगोदर अफगानिस्तान विरुद्धच्या सामन्यात धोनीच्या संथी खेळीबाबत सचिन तेंडूलकरने टिपण्णी केली होती. 


भारताचा पराभव आणि धोनीच्या संथ खेळीबाबत कोण काय म्हणाले... 

 

 

 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...