आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटर गौतम गंभीरची राजकीय इनिंग सुरू; भाजपात केला प्रवेश, दिल्लीतून करणार लोकसभेची बॅटींग...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- माजी फलंदाज गौतम गंभीरने आच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत गंभीरने भाजपचे कमळ हाती घेतले आहे. गंभीर दिल्लीतील सुरेंद्र नगरमध्ये राहतो त्यामुळे तो याच मतदार संघातून निवडणुकीसाठी उभा राहणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे.

 


नवी दिल्लीतल्या सातही जागा भाजपने जिंकल्या आहेत, पण मागील पाच वर्षात येथील उमेदवारांविषयी लोकांच्या मनात आता 2014 साली होती तशी भावना नाहीये. त्यामुळे यावेळी सातपैकी काही उमेदवारांचा पत्ता कट होण्याची चिन्हे दिसत आहेत. अशातच या खासदारांच्या जागांवर भाजप नव्या उमेदवांना संधी देऊ शकतो. त्यामुळे गंभीरने निवडणुकीपूर्वी केलेला भाजप प्रवेश त्याच्यासाठी फायद्याचा ठरेल अशी आशा आहे.

 


डिसेंबर 2018 मध्ये गंभीरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, तेव्हापासून तो नेहमी राजकारणावर प्रतिक्रीया देताना दिसत आहे. यावूर्वी त्याने अरविंद केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला होता. तेव्हापासून तो राजकारणात एंट्री करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होते. आज अखेर त्याने राजकारणात प्रवेश करत आपल्या नव्य इनिंगला सुरूवात केली आहे. क्रिकेटच्या मैदानात तर त्याने जोरदार फटकेबाजी केलीच आहे, पण राजकारणाच्या पीचवर तो कशी बॅटींग करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...