आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्दिकला आठ महिन्यांनंतर संधी; धवन,भुवीचे पुनरागमन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - यजमान भारतीय संघ आता घरच्या मैदानावर मालिका विजयाची धुळवड खेळण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी दक्षिण आफ्रिका संघाला दाैऱ्यावर निमंत्रित केले. यातूनच आता येत्या १२ मार्चपासून यजमान भारतीय संघ घरच्या मैदानावर पाहुण्या आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी रविवारी भारतीय संघाची घाेषणा करण्यात आली. नवनियुक्त निवड समिती अध्यक्ष सुनील जाेशीच्या नेतृत्वात हा संघ जाहीर करण्यात आला. या दरम्यान १५ सदस्यीय संघात दुखापतीतून सावरलेल्या आॅल राउंडर हार्दिक पांड्याचा समावेश आहे. त्याला आठ महिन्यानंतर वनडे संघात संधी मिळाली आहे. याशिवाय स्फाेटक फलंदाज शिखर धवन आणि वेगवान गाेलंदाज भुवनेश्वर कुमारची संघात निवड झाली. यामुळे आता हे तिघेही आफ्रिकेविरुद्ध मालिकेत पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहेत.  आॅस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेदरम्यान खांद्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे शिखर धवनला विश्रांती देण्यात आली हाेती. तसेच भुवनेश्वर याच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे आता ताेदेखील यातून सावरला आहे. दुसरीकडे राेहित शर्मा अद्यापही फिट नाही. त्यामुळेच त्याचा आगामी १३ व्या सत्राच्या आयपीएलमधील सहभाग अनिश्चित मानला जाताे. भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, केएल राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव, शुभमन गिल.
 
 
मालिकेचे वेळापत्रक 

पहिला वनडे    12 मार्च    धर्मशाला


दूसरा वनडे    15 मार्च    लखनऊ


तिसरा वनडे    18 मार्च    काेलकाता

बातम्या आणखी आहेत...