आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणने सर्व फॉर्मेटमधून निवृत्तीची केली घोषणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ठरला होता सामनावीर
  • इरफानने भारताकडून 29 कसोटी, 120 एकदिवसीय आणि 24 ट्वेंटी20 सामने खेळले आहेत

स्पोर्ट डेस्क - भारताचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो म्हणाला की, ''गांगुली, लक्ष्मण आणि द्रविड यासारख्या खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करायला मिळला यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. या प्रवासासाठी मी माझ्या कुटुंबाचे आभार मानू इच्छितो.''इरफान पठाणने 2007च्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरूद्ध उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. या सामन्यात त्याने 16 धावा देत 3 गडी बाद केले होते. यासाठी त्याला सामनावीर घोषित करण्यात आले होते. इरफानने या विश्वचषकात 14.90च्या सरासरीने 10 गडी बाद केले होते. कसोटी सामन्याच्या पहिल्या षटकात हॅटट्रिक करणारा पहिला गोलंदाज
 
पठाण कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रीक करणाऱा भारताचा दुसरा गोलंदाज होता. त्याच्या अगोदर ऑफ स्पिनर हरभजन सिंगने 2001 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकाता कसोटीत हा पराक्रम केला होता. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हॅटट्रिक घेणारा तिसरा भारतीय आहे. गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध जमैका कसोटीत बुमराहने ही कामगिरी केली होती. पठाण कसोटी सामन्याच्या पहिल्या षटकात हॅटट्रिक घेणारा जगातील पहिला गोलंदाज आहे. 2006 मध्ये कराची कसोटीत सलमान बॅट, युनुस खान आणि मोहम्मद युसूफ यांना बाद करून त्याने हे कामगिरी केली होती.

 

बातम्या आणखी आहेत...