आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cricket News : Dhoni Is Not Part Of Team India For Six Months, His Seat On The Bus Remains Empty

चहलने सांगितले - टीम इंडियाच्या बसमध्ये धोनीच्या जागेवर कोणीही बसत नाही, सहा महिन्यांपासून ही जागा रिकामी आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाच्या बसमध्ये ऑकलंडहून हॅमिल्टनकडे जात असताना चहलने व्हिडिओ तयार केला - Divya Marathi
टीम इंडियाच्या बसमध्ये ऑकलंडहून हॅमिल्टनकडे जात असताना चहलने व्हिडिओ तयार केला

स्पोर्ट डेस्क - टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी गेल्या सहा महिन्यांपासून टीमचा भाग नसला तरी टीम बसमधील त्याची जागा रिक्त राहिली आहे. भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलचा एक व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. या व्हिडिओत चहलने दाखवले की, धोनी ज्या जागेवर बसून प्रवास करत होता, त्यावर कोणीही बसत नाही. धोनीने आपला शेवटचा सामना गेल्या वर्षी 9 जुलै रोजी न्यूझीलंड विरूद्ध खेळला होता. आम्हाला त्यांची खूप आठवण येते - चहल 


बीसीसीआच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या बसमध्ये ऑकलंडहून हॅमिल्टनकडे जात असताना चहलने व्हिडिओ तयार केला.
चहल या व्हिडिओच्या शेवटी त्या सीटवर जातो जेथे धोनी बसत होता. चहल सीटकडे इशारा करत म्हणतो की, 'येथे दिग्गज बसत होते. माही भाई (महेंद्रसिंह धोनी), आता येथे कोणीही बसत नाही. आम्हाला त्यांची खूप आठवण येते.'  

 

बातम्या आणखी आहेत...