आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिडलेल्या कांगारू बॉलरने विराटला टाकला असा चेंडू, कुणालाच कळला नाही...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दोन बाद 215 धावा केल्या. पहिल्या डावाच्या अखेरीस चेतेश्वर पुजाराने नाबाद 68 आणि कर्णधार विराट कोहलीने नाबाद 47 धावांची खेळी केली. याआधी ओपनर मयंक अग्रवालने डेब्यू टेस्टमध्ये अर्ध शतकाची खेळी केली. त्या सामन्यात विराट कोहली 47 धावांच्या खेळीवर खेळत होता. त्यानंतर मिशेल स्टार्क गोलंदाजी करायला आला तेव्हा पहिल्या डावाच्या 4 ओव्हर बाकी होत्या. मिशेल स्टार्क गोलंदाजी करण्यासाठी आल्यानंतर त्याने पहिलाच बॉल अत्यंत वेगाने विराट कोहलीच्या दिशेने फेकला. त्यावेळी तो बॉल विराटच्या जवळून जाऊन बाउंड्रीच्या दिशेने गेला. ते पाहून कर्णधार विराट कोहली आश्चर्यचकीत झाला आणि मिशेल स्टार्ककडे पाहून जोर-जोरात हसू लागला. नेमके याच दृश्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.


पुजाराने ठोकले 21 वे अर्धशतक
भारतीय ओपनर्सनी 18.5 व्या ओव्हरपर्यंत फलंदाजी केली. यावेळी विहारी आणि मयंक यांनी 40 धावांची खेळी केली. मयंकने आपल्या कसोटी सामन्यांत अर्धशतक ठोकले. मयंकनंतर चेतेश्वर पुजारानेही अर्धशतक ठोकले. हे अर्धशतक त्याच्या आजपर्यंतच्या करिअरमध्ये 21 वे अर्धशतक होते.

 

बातम्या आणखी आहेत...