आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cricket, Played By Prince Williams With His Wife And Children, Also Went To The Monarchy

प्रिन्स विल्यम्स यांनी पत्नी व मुलांसोबत खेळले क्रिकेट, बादशाही मशिदीतही गेले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद : ब्रिटिश प्रिन्स विल्यम्स व त्यांची पत्नी डचेस ऑफ केंब्रिज कॅट मिडलटन पाकिस्तानच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. चौथ्या दिवशी गुरुवारी ते लाहोरला गेले. तेथे मुलांसोबत त्यांनी क्रिकेटचा सामना खेळला. सामन्यादरम्यान, विल्यम खूप खुश होते. प्रिन्सने एका बॉलवर षटकार मारला तर कॅटने सहा बॉलमध्ये दोन वेळा झेल दिला. इतर खेळाडूंनी त्यांचे झेल सोडले. या खेळाचा ब्रिटिश दाम्पत्याने खूप आनंद घेतला.

१९९७ मध्ये प्रिन्सच्या आईची भेट
ब्रिटिश शाही दांपत्य कॅन्सर हॉस्पिटलला गेले होते. याच रुग्णालयास प्रिन्स विल्यम्सच्या आई डायना यांनी भेट दिली होती. या जोडप्याने जगातील सर्वात मोठी मशीद बादशाही मशिदीलाही भेट दिली. कॅटने डोक्यावर दुपट्टा घेतला होता.