आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वचषक तिकिटांचा काळाबाजार , इंग्लंड-ऑस्ट्रेलिया लढतीचे तिकीट ११ लाखांत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - क्रिकेटमधील निकालनिश्चिती, सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंगच्या प्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी आयसीसी आपली अँटी करप्शन यंत्रणा अधिक सक्षम करीत आहे. मात्र याच संघटनेचे विश्वचषक २०१९ च्या तिकिटांच्या खुलेआम चाललेल्या काळाबाजाराकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे. विश्वचषक २०१९ च्या लॉर्ड््सवर २५ जून रोजी होणाऱ्या इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याचे एक तिकीट चक्क ११ लाख रुपये एवढ्या चढ्या भावात विकले गेले आहे. म्हणजे आयसीसीने निश्चित केलेल्या आणि विकलेल्या किमतीच्या तब्बल १०४ पट अधिक किमतीला हे तिकीट विकले गेले आहे.  


इंग्लंडमध्ये कोणत्याही खेळांच्या किंवा कार्यक्रमांच्या तिकिटांच्या विक्रीसाठी किंवा पुनर्विक्रीसाठी अधिकृत कंपन्यांची संकेतस्थळे आहेत, ज्यावर तुम्हाला तिकिटे विकत घेता येतात किंवा विकताही येतात. मूळ किमतीच्या शंभरपटीपेक्षा अधिक किमतीत जर तिकीट विकले जात असेल तर हा ‘काळाबाजार’ नाही का?  


आयसीसी २०१९ विश्वचषक आयोजकांनी याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे ठरवले आहे. मात्र ज्या आयसीसीची ही स्पर्धा आहे त्यांनी यापूर्वीही याकडे कानाडोळाच केला होता. २०११ च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान अशा कंपन्यांमार्फत होणाऱ्या तिकीटविक्रीबाबत भारताने विचारले होते. त्यावर आयसीसीने आपण हतबल असल्याचे म्हटले होते. बीसीसीने दिलेल्या वृत्तानुसार इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्या साखळी सामन्याचे (२५ जून) तिकीट १२ हजार पौंडाला (सुमारे ११ लाख रुपये) विकले गेले. 

 

पुनर्विक्रीची न करण्याची अट, तरीही होत आहे विक्री 

आयसीसीने विश्वचषक २०१९ ची तिकिटे विकताना ही तिकिटे पुनर्विक्रीसाठी नाहीत अशी अट घातली. आयसीसीने आपल्या संकेतस्थळावर तिकिटे कोणत्याही संकेतस्थळावर जनतेच्या विक्रीसाठी ठेवता येणार नाहीत हे स्पष्ट केले. तरीही लंडनस्थित ‘वाय गो गो’सारख्या कंपन्या तिकिटांची सरास विक्री करत आहेत? स्पर्धेला ५ महिने बाकी असतानाही चढ्या भावात तिकिट विकत आहे.आयसीसीने विश्वचषक २०१९ ची तिकिटे विकताना ही तिकिटे पुनर्विक्रीसाठी नाहीत अशी अट घातली. आयसीसीने आपल्या संकेतस्थळावर तिकिटे कोणत्याही संकेतस्थळावर जनतेच्या विक्रीसाठी ठेवता येणार नाहीत हे स्पष्ट केले. तरीही लंडनस्थित ‘वाय गो गो’सारख्या कंपन्या तिकिटांची सरास विक्री करत आहेत? स्पर्धेला ५ महिने बाकी असतानाही चढ्या भावात तिकिट विकत आहे.
 

बातम्या आणखी आहेत...