आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्ट्स डेस्क - भारतीय क्रिकेट टीमला परदेशात पहिला मालिका विजय मिळवून देणारे दिग्गज माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे बुधवारी मुंबईत निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. वाडेकर परदेशात सिरीझ जिंकून देणारे भारताचे पहिले कर्णधार होते. सोबतच, भारताचे पहिले वनडे इंटरनॅशनल कॅप्टन आणि पहिले ऑफिशियल कोच सुद्धा बनले. 1 एप्रिल 1941 रोजी जन्मलेले वाडेकर यांनी आपल्या 8 वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये 37 टेस्ट आणि 2 वनडे मॅच खेळले. आपल्या कारकीर्दीत ते धडाडीचे बॅट्समन आणि उत्कृष्ठ स्लिप फील्डर म्हणून ओळखले जात होते. त्यांना 1967 मध्ये अर्जुन अवॉर्ड आणि 1972 मध्ये पद्मश्री अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते.
असे आहे क्रिकेट करिअर
> 1958 मध्ये फर्स्ट क्लास डेब्यू करणारे अजित वाडेकर यांनी टीम इंडियासाठी डिसेंबर 1966 मध्ये पहिला टेस्ट सामना खेळला होता. आपल्या करिअरमध्ये त्यांनी एकूण 2113 धावा काढल्या. यात एक शतक आणि 14 अर्धशतकांचा समावेस आहे. सोबत त्यांनी आपल्या करिअरमध्ये 46 कॅच घेतल्या.
> अजित वाडेकर यांना 1971 मध्ये टीमचे कर्णधार पद मिळाले होते. त्यावेळी सुनिल गावसकर, गुंडप्पा विश्वनाथ, फारुख इंजीनिअर, बिशन सिंह बेदी, ईएएस प्रसन्ना, भागवत चंद्रशेखर आणि श्रीनिवासन वेंकटराघवन असे दिग्गज खेळाडू टीममध्ये होते. वाडेकरांनी आपल्या करिअरचा शेवटचा टेस्ट सामना जून 1974 मध्ये खेळला.
> वाडेकर यांच्या नावे टीम इंडियाचे पहिले वनडे कॅप्टन असा मान आहे. त्यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने 1974 मध्ये आपला पहिला आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळला. त्यांनी केवळ 2 वनडे सामने खेळले तरीही यात 36.5 च्या सरासरीसह एकूण 73 धावा काढल्या. त्यांनी इंग्लंड विरोधात करिअरचा पहिला वनडे खेळताना 67 धावा काढल्या होत्या.
परदेशात मिळवून दिला पहिला मालिका विजय
भारतीय क्रिकेट टीम 1971 मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात वेस्ट इंडीझ दौऱ्यावर होती. त्यावेळी इंडीझला 1-0 ने पराभूत करून परदेशी जमीनीवर भारताला पहिला विजय मिळवून दिला. या टूरमध्ये एकूण 5 टेस्ट सामने झाले. पहिला सामना ड्रॉ ठरला. दुसऱ्या सामन्यात भारताने दिलीप सरदेसाई यांच्या शतकाच्या जोरावर वेस्ट इंडीझला 7 गडींनी पराभूत केले. पुढील तीन टेस्ट सुद्धा ड्रॉ ठरले. याचवर्षी इंडियन टीमने वाडेकर यांच्या कॅप्टनशिपमध्ये इंग्लंड दौरा केला. जेथे तीन सामन्यांच्या सिरीझमध्ये भारताने इंग्लंडला 1-0 ने पराभूत केले. सिरीझचे दोन सामने ड्रॉ झाले. यानंतर शेवटच्या सामन्यात भारताने इंग्लंडला 4 गडींनी पराभूत केले. सामन्यात चंद्रशेखर यांनी 8 गडी बाद केले होते.
इंजीनिअरिंग सोडून बनले क्रिकेटर, पहिल्या मॅचची फी 3 रुपये
वाडेकर इंजीनिअर बनू इच्छित होते. एकदा ते आपला सीनिअर आणि शेजारी बाळू गुप्तेसोबत कॉलेजला जात होते. बाळू कॉलेजच्या क्रिकेट टीमचा सदस्य होता. अजित यांना त्यानेच विचारले होते, की टीमचा 12 खेळाडू होशील का? यासाठी 3 रुपये मॅच फी मिळेल असेही त्यांना सांगितले होते. त्यावेळी 3 रुपये मोठी रक्कम होती. त्यामुळे वाडेकर ती ऑफर नकारू शकले नाही. कॉलेजच्या क्रिकेट टीममध्ये सहभागी झाल्यानंतर सुनील गावस्कर यांचे काका माधव मंत्री यांनी त्यांचे टॅलेन्ट ओळखले. त्यांनीच वाडेकरांना टीम इंडियामध्ये स्थान मिळवून दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.