आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटर अंबाती रायडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती, पत्र लिहून बीसीसीआयला दिली माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क- भारतीय क्रिकेटर अंबाती रायडू(33)ने आज(बुधवार) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने बीसीसीआयला पत्र लिहून क्रिकेटमधल्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्त होत असल्याचे सांगितले. रायडूला विश्वचषकातील संघात स्थान दिले नव्हते. पण रायडून आयपीएलमध्ये खेळले का नाही ते अजून स्पष्ट नाहीये.


वर्ल्ड कप स्क्वॉडमध्ये रायडूला रिझर्वमध्ये टाकून युवा ऑलराउंडर विजय शंकरला संधी देण्यात आली होती. निवडकर्त्यांनी शंकरला संधी देण्यामागे तो 3 डी प्लेअर म्हणजेच फलंदाजी, गोलंदाजी आणि फील्डर असे कारण सांगतले. यावर रायडूने मी वर्ल्ड कप पाहण्यासाठी 3 डी ग्लासेस घेतले असल्याचा टोमणाही मारला होता.


रायडूला सोडून पंत आणि मयंकला संधी
वर्ल्ड कपमध्ये शिखर धवन आणि विजय शंकर दुखापतग्रस्त झाल्यावर रायडूला संधी दिली नाही. त्याच्या ऐवजी ऋषभ पंत आणि मयंक अग्रवालला घेण्यात आले. आयसलंड क्रिकेटने ट्वीट करून रायडूला आपल्यासोबत येण्याची ऑफर दिली होती.


55 वनडेत 1,694 रन 
रायडूने 55 वनडे सामन्यात 47.05 च्या सरासरीने 1,694 रन काढले आहेत. यात त्याने तीन तीन शतक आणि 10 अर्धशतक आहेत. रायडूने 6 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 10.50 च्या सरासरीने 42 रन बनवले आहेत. पण त्याला कसोटी खेळण्याची कधीच संधी मिळाली नाही.