Home | Maharashtra | Vidarva | Chandrapur | cricketer brian lara visited tadoba andhari tiger national park at chandrapur

तिकडे इंग्लंडमध्ये वर्ल्डकप सुरू आहे पण, वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा सहकुटुंब चंद्रपुरात आलाय...

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 12, 2019, 06:18 PM IST

लाराला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची भुरळ लागली आहे

 • cricketer brian lara visited tadoba andhari tiger national park at chandrapur

  चंद्रपूर- क्रिकेट विश्वात वाघ अशी ओळख असलेला वेस्ट इंडिज संघाचा माजी कर्णधार ब्रायन लारा सध्या सहकुटुंब चंद्रपूरमध्ये आला आहे. तिकडे इंग्लंडमध्ये वर्ल्डकपची धामधूम सुरू आहे, पण लारा चंद्रपुरमध्ये कशाला आला प्रश्न अनेकांना पडला असेल. तर झाले असे की, लारा चंद्रपुरातील ताडोब अभयारण्य पाहायला आला आहे. लाराला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची भुरळ लागली आहे.


  वाघ पाहण्यासाठी लारा कालपासून ताडोबात आला आहे. तो मंगळवारी इथे आला असून, एका खासगी रिसॉर्टमध्ये मुक्कामी आहे. गुरुवारी तो मोहुर्ली येथून सकाळी जंगल सफारीचा आनंद लुटणार आहे. हा दौरा कौटुंबिक असल्याचे बोलले जात आहे.

  वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान लारा समालोचक अर्थात कॉमेंटेटरच्या भूमिकेत दिसतो. मात्र टीम इंडियाचा माजी कर्णधार अनिल कुंबळेची फोटोग्राफी पाहून, लारा ताडोबाच्या प्रेमात होता. त्यामुळेच वेळात वेळ काढून लारा ताडोबा अभयारण्यात आला आहे.


  कोण आहे ब्रायन लारा?
  ब्रायन लारा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतातील मोठे नाव आहे. ब्रायन लारा वेस्ट इंडिजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. त्याने वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. लाराने 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.

Trending