आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आला मृत्यूआधीचा व्हिडिओ; क्रिकेटपटू सारखा चोळत होता छाती...थोड्याच वेळात हृदयविकाराच्या झटक्याने झाला दुर्दैवी मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भांडुपमध्ये क्रिकेट खेळत असताना एका तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वैभव केशकर असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे वैभव बॅटींग करण्यासाठी मैदानात उतरला. मैदानात असताना तो सारखा आपली छाती चोळताना दिसत आहे. मैदानावरच त्याची प्रकृती बिघडल्याने त्याच्या मित्रांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु उपचारादरम्यान काही तासांतच त्याचा मृत्यू झाला. वैभवच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्याच्या मित्रांवरही शोककळा पसरली आहे.

 


हृदयविकाराच्या झटक्याने झाला वैभवचा मृत्यू  
सुत्रांनी सांगितल्यानुसार, रविवारी मुंबईच्या भांडुपमध्ये टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट सुरू होती. त्या टुर्नामेंटमध्ये मृत वैभवही सहभागी झाला होता.   मैदानावर खेळत असताना अचानक त्याच्या छातीत दुखायला लागल्याने तो सारखी छाती चोळु लागला. त्यामुळे त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतू उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांना मृत वैभवच्या मृत्यूचे कारण विचारले असता हृदयविकाराच्या झटक्याने वैभवचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

 

 

बातम्या आणखी आहेत...