आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओळखलंत का? Star क्रिकेटर बनण्यापूर्वी असा दिसायचा पंड्या, एकेकाळी मॅगी खाऊन जगायचा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - हार्दिक पंड्या 11 ऑक्टोबर रोजी आपला 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. तो भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटचा एक स्टार म्हणून ओळखला जातो. आता कोट्यधींचा मालक असला तरीही एक वेळ अशीही होती, जेव्हा या सुपरस्टारने मॅगीवर दिवस काढले होते. त्याने हा खुलासा एका मुलाखतीमध्ये केला होता. एक बॉलर म्हणून त्याची तुलना महान गोलंदाज कपिल देवशी केली जात आहे. इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात त्याने 78 धावांची इनिंग खेळत भारताला विजय मिळवून दिला. एका स्ट्रगलिंग क्रिकेटरपासून स्टार बनण्याचे पंड्याचे संघर्ष काही सोपे नव्हते. 23 वर्षीय पंड्या जानेवारी 2016 मध्ये ऑस्ट्रेलिया विरोधात टी-20 डेब्यू करून चर्चेत आला होता. सुरुवातीला त्याने बडोदा येथून देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे. मात्र, तो चमकला तो आयपीएलमध्येच...


आयपीएलनंतरच मिळाली टीम इंडियात एंट्री
हार्दिक पंड्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळतो. 2015 मध्ये त्याने आयपीएल डेब्यू केला होता. पहिल्याच सीजनमध्ये त्याने 9 सामन्यांत 181 धावांचा स्ट्राइक रेट घेतला. लोअर ऑर्डरमध्ये पंड्या छोटीशीच का होत नाही, पण जबरदस्त इनिंग खेळतो. त्यावेळी नाबाद 61 धावा त्याचा बेस्ट स्कोर होता. याच परफॉर्मंसमुळे त्याला जानेवारी 2016 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-20 सामन्यात टीम इंडियामध्ये जागा मिळाली. ऑलराउंडर पंड्याने आयपीएलच्या तीन सीजनमध्ये 37 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 406 धावा केल्या. तसेच 10 विकेट्स सुद्धा घेतल्या. सध्या त्याचा स्ट्राइक रेट 142.5 असा आहे. आता पंड्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा एक आवश्यक आणि अतिशय महत्वाचा खेळाडू बनला आहे.


मॅगीवर काढले दिवस...
हार्दिक पंड्या आणि त्याचा भाऊ कृणाल यांना क्रिकेटर बनवण्याचे स्वप्न त्यांच्या वडिलांनी पाहिले होते. दोघांचे वय कमी असल्याने किरण मोरे यांनी त्यांना आपल्या अकॅडमीत प्रवेश देण्यास नकार दिला होता. नंतर या दोघांचे टॅलेन्ट पाहून किरण मोरे यांनी आपल्या नियमांत बदल केला आणि दोघांनाही अकॅडमीत जागा दिली. हार्दिक पंड्याचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या कमकुवत होते. अनेकवेळा या कुटुंबाला दोन वेळचे जेवण सुद्धा अवघड होत असे... स्ट्रगलिंगच्या काळात आपण कित्येक दिवस मॅगी खाऊन काढले असा खुलासा पंड्याने एका मुलाखतीमध्ये केला होता. हार्दिकला क्रिकेटर बनवण्यासाठी त्याचे वडील सुरतहून बडोद्याला शिफ्ट झाले होते. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, स्टार बनण्यापूर्वी असा होता हार्दिक पंड्या...

बातम्या आणखी आहेत...