आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉन्ट्रोवर्सीमुळे हताश झाला क्रिकेटर हार्दिक पांड्या, आता करण जोहरकडे केली 'कॉफी विद करण'चा एपिसोड डिलीट करण्याची मागणी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. प्रसिध्द चॅट शो 'कॉफी विद करण' मध्ये वादग्रस्त वक्तव्य दिल्यानंतर क्रिकेटर हार्दिक पांड्याने आता करण जोहरला तो एपिसोड डिलीट करण्याची मागणी केली आहे. कारण यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात टिकेचा समान करावा लागला आहे. कॉन्ट्रोवर्सीमुळे हताश झालेल्या क्रिकेटर हार्दिक पांड्याने करण जोहरला मॅसेज पाठवला आहे, यामध्ये हा शो डिलीट करण्याची अपील करण्यात आली आहे. 

 

सूत्रांनुसार, "कुणीही कल्पना केली नव्हती की, या गोष्टी असे वळण घेतील, कारण या शोमध्ये नेहमीच मस्तीमूडमध्ये बोलले जाते. पण यावेळी हार्दिक आणि केएल राहुलवर अशा प्रकारे टिका झाली. याची कुणालाही अपेक्षा नव्हती. एका क्षणात परिस्थिती बिघडली. हार्दिकला वाटले होते की, माफी मागणारे व्यक्तव्य दिल्यानंतर प्रकरण शांत होईल, पण असे झाले नाही. हार्दिक पांड्याच्या रिक्वेस्टवर चॅनल आणि करण जोहरने गंभीरतेने विचार केला आणि क्रिकेटर्सच्या करिअरसाठी त्यांनी हा एपिसोड डिलीट करण्याचा निर्णय घेतला आहे." याच काळा स्टार नेटवर्कने 'कॉफी विद करण'चा वादग्रस्त एपिसोड डिलीट केला आहे. 

 

काय होते पुर्ण प्रकरण 
25 वर्षांचा हार्दिक पांड्या करण जोहरचा टॉक शो कॉफी विद करणमध्ये त्याचासोबती क्रिकेटर राहुल केसोबत सहभागी झाला होता. यामध्ये त्याने महिलांसंबंधीत प्रश्नांवर त्याची वादग्रस्त प्रतिक्रिया दिली. यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर निशाना साधण्यात आला. हे प्रकरण खुप वाढले आणि बीसीसीआयला नोटीस जारी करावी लागली. हार्दिक शोमध्ये म्हणाला होता की, त्याचे अनेक महिलांसोबत संबंध आहेत. या व्यक्तव्यामुळे कॅप्टन विराट कोहलीसोबतच पुर्ण टीने स्वतःला वेगळे ठेवले होते. विराट म्हणाला होता की, "भारतीय क्रिकेट टीम आणि जबाबदार क्रिकेटर्सच्या नात्याने आम्ही त्याच्या विचारांसोबत सहमत नाही. तो जे काही बोलला ते पर्सनल आहे."

 

हार्दिकने ट्वीट करुन मागितली होती माफी 
वादानंतर हार्दिक माफी मागताना म्हणाला होता, "मी एका चॅट शोवर गेलो होतो. मी काही व्यक्तव्य केले. यादरम्यान मी कुणाच्या भावनांना ठेच पोहोचू शकते याचा विचार केला नाही. मी याची मनापासून माफी मागतो. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की, मी वाईट हेतूने किंवा समाजाच्या एखाद्या वर्गाला वाईट दर्शवण्यासाठी असे केले नाही. प्रामाणिकपणे सांगतो की, मी शोच्या नेचरनुसार त्यामध्ये वहावत गेलो. कुणाच्या भावनांचा अपमान करणे किंवा कुणाला दुःख पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता." हार्दिकच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर काही मॅचसाठी प्रतिबंधही लावले आहेत. 

 


 

बातम्या आणखी आहेत...