Home | Maharashtra | Mumbai | Cricketer hits on the field also the wrestler on the screen

मैदानावर क्रिकेटपटू हिट; परंतु पडद्यावर पहिलवान-धावपटूंची कमाई सर्वाधिक

सनुप सहदेवन | Update - Dec 09, 2018, 06:45 AM IST

बाॅलीवूडमध्ये १० खेळाडूंच्या बायाेपिकवर सध्या सुरू अाहे काम

 • Cricketer hits on the field also the wrestler on the screen

  मुंबई- दिग्दर्शक अानंदकुमार हे अाता भारतीय फुटबाॅल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतियावर चित्रपट बनवत अाहेत. बाॅलीवूडमध्ये हल्ली खेळाडूंच्या जीवनावर सिनेमे बनवण्याच्या ट्रेंडने जाेर पकडला असून, खेळाशी संबंधित सुमारे १० बायाेपिकवर काम सुरू अाहे. या ट्रेंडची सुरुवात धावपटू मिल्खा सिंह यांच्या जीवनावर बनलेल्या ‘भाग मिल्खा भाग’पासून झाली. या चित्रपटाने देशात शंभर काेटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय केला. त्यामुळे इतर खेळाडूंच्या जीवनावर चित्रपट बनवण्याचा मार्ग खुला झाला. तथापि, स्पाेर्ट्स बायाेपिकच्या यश-अपयशाबाबत एक रंजक ट्रेंड पाहण्यास मिळाला अाहे. देशात क्रिकेटचा ज्वर माेठ्या प्रमाणात अाहे; परंतु जगप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (५० काेटी कमाई) व माेहंमद अझरुद्दीन (५६ काेटी कमाई) यांच्या जीवनावर बनवलेले सिनेमे पाहिजे तेवढे यशस्वी ठरले नाहीत. दुसरीकडे फाेगट कुटुुंबावर बनलेला ‘दंगल’ चित्रपट मात्र सर्वात जास्त हिट ठरला.

  तसेच ‘एम.एस.धाेनी’ही हिट झाला. चित्रपट व्यवसाय विश्लेषक तरण अादर्श सांगतात की, खेळाडूंची जीवनकथा चांगल्या प्रकारे मांडली तर ती खूप हिट हाेऊ शकते, हा विश्वास ‘भाग मिल्खा भाग’ ने निर्माण केला. तसेच नरेंद्र गुप्ता म्हणाले की, प्रियंका चाेप्राने मेरी काेमची भूमिका साकारल्याने तिची प्रेरणादायक कहाणी सर्वदूर पाेहाेचली. त्यानंतर अनेक चित्रपट स्टुडिअाेंनी माेठ्या खेळाडूंशी संपर्क साधला. दिग्दर्शक नीरज पांडेंनी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धाेनी व निर्माती एकता कपूरने माेहंमद अझरुद्दीनवर चित्रपट बनवण्याची घाेषणा केली. तरण अादर्श यांनी सांगितले की, रणवीर सिंह व श्रद्धा कपूर यासारखे माेठे कलाकार अाता स्पाेर्ट्स बायाेपिकमध्ये काम करताना दिसतील. माेठे स्टार असल्याने प्रेक्षकांची पावले सहजपणे चित्रपटांकडे वळतात. मात्र, ज्या खेळाडूवर बायाेपिक बनताेय त्यात काम करणारा कलाकार जवळपास त्या खेळाडूसारखा दिसला पाहिजे, याचे भान ठेवावे लागते. व्यवसाय विश्लेषक व चित्रपट पत्रकार अामाेद मेहरा सांगतात की, बहुतांश खेळाडूंची जीवनकहाणी अापण अगाेदरपासूनच जाणत असताे. त्यामुळे त्या कथेत नावीन्य अाणणे, हेच माेठे अाव्हान असते. ते न पेलले गेल्यास चित्रपट अापटू शकताे.

  > ८३ क्रिकेट वर्ल्डकप : रणवीर सिंह साकारताेय कपिल देवची भूमिका, तर दिग्दर्शक अाहेत कबीर खान.

  > सायना नेहवाल : दिग्दर्शक अमाेल गुप्ते. श्रद्धा कपूर बनणार सायना.

  > अभिनव बिंद्रा : हर्षवर्धन कपूर करणार नेमबाज अभिनव बिंद्राची भूमिका.
  > पुलेला गाेपीचंद : या बायाेपिकची निर्मिती फाॅक्स स्टार स्टुडिअाेजची.
  > ध्यानचंद : निर्माती पूजा शेट्टी हा चित्रपट बनवत असल्याची चर्चा.
  > मिताली राज : मितालीवर सिनेमा बनवण्याचा व्हायकाॅम-१८ चा विचार.
  > पी.व्ही.सिंधू : साेनू सूद सिनेमा बनवण्याच्या तयारीत असून यात दीपिका पदुकाेण तिच्या भूमिकेत शक्य.

Trending