आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटर मोहंमद शमीची पत्नी हसीन जहांला मध्यरात्री अटक, पती-पत्नीचा वाद पुन्हा चर्चेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - भारतीय क्रिकेट संघाचा तूफान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. हसीन जहांला अमरोहा पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. तिच्यावर कलम 151 अंतर्गत शांतता भंग केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. यानंतर तिला सोमवारीच न्यायालयात हजर करण्यात आले. हसीन जहां रविवारी मध्यरात्री शमीच्या वडिलांच्या घरी गेली होती. यावेळी तिने शमीच्या आई आणि वडिलांसोबत वाद घातला. यानंतर शमीच्या कुटुंबियांना पोलिसांना बोलावून हसीन जहांला त्यांच्या हवाली केले.


पोलिस चौकशी झाली तेव्हा हसीन जहांला आली मोदी, योगींची आठवण
हसीन जहांला अटक केल्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केली. यावेळी बोलताना तिने शमीवर गंभीर आरोप केले आहेत. शमी एक सेलिब्रिटी आहे. तो पैशांच्या जोरावर दबाव तंत्र वापरून मुद्दाम त्रास देत आहे असे तिने म्हटले. एवढेच नव्हे, पोलिस चौकशीदरम्यान शमीच्या पत्नीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आठवण आली. बेटी बचाओ बेटी पढाओच्या मोहिमा राबवणाऱ्या मोदी आणि योगींनी माझ्या प्रकरणात दखल का घेतली नाही. मला विनाकारण त्रास दिला जातोय, माझा छळ होतोय, मला मध्यरात्री झोपेतून उचलून पोलिस अटक करतात. असे गाऱ्हाणे शमीच्या पत्नीने मांडले आहे. गेल्या वर्षभरापासून शमीची पत्नी आपल्या पतीवर विवाहबाह्य संबंध आणि चक्क स्पॉट फिक्सिंगचे आरोप लावत आहे. परंतु, बीसीसीआयने मोहंमद शमीला यापूर्वीच क्लीनचिट दिली.

बातम्या आणखी आहेत...