Home | Sports | From The Field | cricketer rahul sharma show good performance in ipl 2011

लकव्यातून उभारत राहुल शर्माची आयपीएलमध्ये चमक

Agency | Update - May 19, 2011, 04:45 PM IST

शर्माने लकव्यासारख्या आजारातून बाहेर पडून जिद्दीच्या जोरावर आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली.

  • cricketer rahul sharma show good performance in ipl 2011

    मुंबई - आपल्या लेगस्पिन फिरकी गोलंदाजीने आयपीएलमध्ये आतापर्यंत छाप उमटविणारा पुणे वॉरियर्सचा गोलंदाज राहुल शर्माने लकव्यासारख्या आजारातून बाहेर पडून जिद्दीच्या जोरावर चमकदार कामगिरी केली आहे.

    लकव्याची शिकार झाला असतानाही राहुल शर्माने सराव चालूच ठेवला व आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. राहुलच्या याच मेहनतीचे दखल घेऊन समालोचक रवी शास्त्री यांनी राहुलमध्ये फलंदाजांना रोखून ठेवण्याची क्षमता असून, अनिल कुंबळेची शैली त्याच्या गोलंदाजीत दिसत असल्याचे म्हटले आहे.

    राहुल शर्माला गेल्या वर्षी 'बेल्स फेल्सी' या लकव्याच्या आजाराने ग्रासले होते. चेहऱ्याच्या नसांनी काम करणे बंद केल्याने त्याच्या चेहऱ्याला लकवा मारला गेला. याविषयी बोलताना राहुल म्हणाला, ''माझ्या आयुष्यातील ते क्षण सर्वात कठीण होते. सकाळी झोपेतून उठल्यानंतर मला जाणवले की, माझ्या चेहऱ्याला लकव्याचा झटका बसला आहे. त्यावेळी मला डेक्कन चार्जर्सने करारबद्ध केले होते. मात्र, डॉक्टरांनी राहुलला आराम करण्यास सांगितले होते. राहुलने याकडे लक्ष न देता आपला सराव चालू ठेवला आणि चौथ्या मोसमात पुणे वॉरियर्स संघात स्थान मिळविले. सुरवातीला गोलंदाजी करताना अनेक अडचणी आल्या. समोरचे काही स्पष्ट दिसत नव्हते. पण मी जिद्द सोडली नाही. माझ्या कामगिरीवर मी समाधानी आहे. आय़पीएलचा अनेक खेळाडूंना फायदा झाला असून, परदेशी खेळाडूंनाही भारतीय खेळाडूंमधील गुण हेरता येतात.''

Trending