आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Cute Video: आयपीएल मॅचच्या एक दिवस आधी 81 दिवसांच्या आपल्या चिमुकलीसाठी रॅपर बनला क्रिकेटर रोहित शर्मा, व्हिडीओ पाहून अमिताभ बच्चन यांनीही केले कौतुक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : आयपीएल मॅचेस शनिवारपासून सुरु झाल्या आहेत. मुंबई इंडियन्सची मॅच रविवारी आहे. मॅचच्या आदल्या दिवशी मुंबई इंडियन्स टीमचा कॅप्टन रोहित शर्मा 81 दिवसांच्या मुलीसोबत टाइम स्पेंड करतांना दिसला. त्याने आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेयर केला आहे, ज्यामध्ये तो आपल्या मुलीसाठी रॅपर बनला आणि मुलगी समायराला घेऊन रणवीर सिंहच्या फिल्म 'गली बॉय' मधील गाणे 'कैसे मैं कब..' हे गाणे गायले. गाणे म्हणून तो मुलीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत होता. रोहितचा मुलीसोबतचा व्हिडीओ पाहून अमिताभ बच्चनदेखील स्वतःला कौतुक करण्यापासून रोखू शकले नाही. त्यांनी व्हिडीओ पाहून कमेंट केले, 'Too Cute'...  रोहित मुंबई इंडियन्स टीमचा कॅप्टन आहे. या टीमची ओनर बिजनेसमॅन मुकेश अंबानीची पत्नी नीता अंबानी आहेत.